अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा एकेकाळी मुंबईवर दबदबा होता. दाऊदच्या डी कंपनीची भीती देशातील बडे उद्योगपती आणि मायानगरीतील बड्या कलाकारांना होती. डी कंपनीकडून वसूल करण्यात येणारी रक्कम आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची दहशत कायम होती. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी आपल्या पुस्तकात दाऊद इब्राहिमसोबत झालेल्या भेटीबद्दल उघडपणे लिहिले आहे. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांच्या “खुल्लम खुल्ला: ऋषी कपूर अनसेन्सर्ड” या आत्मचरित्रात खुलासा केला आहे. एकदा चहाच्या निमित्ताने डॉन दाऊद इब्राहिमला भेटलो असल्याचा खुलासा त्यांनी केला आत्मचरित्रात केला आहे. ऋषी कपूर यांनी आत्मचरित्रात हे देखील सांगितले की, वडील राज कपूर यांच्या निधनानंतर दाऊदने “बेकायदेशीरपणे” आपल्या एका माणसाला शोकसंदेश घेऊन मुंबईला पाठवले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऋषी कपूर यांनी आत्मचरित्रात लिहिले आहे की, ते एकदा १९८८ मध्ये दुबईला गेले होते. यादरम्यान ते दुबईच्या विमानतळावर पोहोचताच एका व्यक्तीने त्यांना फोन केला. तो माणूस म्हणाला, भाईंना तुमच्याशी बोलायचे आहे. मला वाटले की, कोणीतरी चाहता असेल ज्याला माझ्याशी बोलायचे असेल. मात्र, त्यावेळी फोन लाइनच्या पलीकडे डॉन दाऊद इब्राहिम होता ज्याने त्याला चहासाठी बोलावले. ऋषी कपूर यांनी लिहिले आहे की, त्या संध्याकाळी मला रोल्स रॉयसमध्ये दाऊदच्या घरी नेण्यात आले. त्यांना बराच वेळ मार्गावर वारंवार फिरवले गेले. हा किस्सा आठवून ऋषी कपूर यांनी नंतर एका टीव्ही मुलाखतीत सांगितले की, जेव्हा ते दाऊदच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले. त्याचवेळी त्यांनी माफी मागितली आणि सांगितले की, मी तुम्हाला चहासाठी बोलावले कारण मी दारू पीत नाही किंवा सर्व्ह करत नाही. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी सांगितले की, या संभाषणादरम्यान दाऊदने कबूल केले की त्याने कधीही कोणाला हाताने मारले नाही. पण हे खरे आहे की, मी इतरांच्या माध्यमातून अनेकांची हत्या केली आहे. दुबईच्या त्या दौऱ्यात दाऊदला भेटल्याबद्दल ऋषी कपूर यांनी आपल्या पुस्तकात अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिल्यानंतर लालकृष्ण आडवाणींना अश्रू अनावर? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य

ऋषी कपूर यांनी त्यांच्या “खुल्लम खुल्ला: ऋषी कपूर अनसेन्सर्ड” या आत्मचरित्रात खुलासा केला आहे की, जेव्हा ते चित्रपटसृष्टीत नवीन होते, तेव्हा त्यांनी एकदा पैसे देऊन पुरस्कार विकत घेतला होता. याचं दु:ख त्यांना अनेक वर्षे सळत होतं. ऋषी कपूर यांनी एकदा २०१३ मध्ये आलेल्या डी-डे चित्रपटात दाऊदपासून प्रेरित भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I never kill anyone with my hand says dawood ibrahim rmt