IND vs PAK video: सोशल मीडियावर सध्या मीम्सचा तुफान पाऊस पडत आहे. भारताने पाकिस्तानचा परभाव केल्यानंतर रात्री ट्रॉफी घेताना मोठा ड्रामा झाला. त्यामुळे आता या मीम्समध्ये मोठी भर पडली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया चषक २०२५ स्पर्धेत अपराजित राहण्याचा सिलसिला कायम ठेवत अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला आणि दिमाखात विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. भारतीय फॅन्स प्रचंड खुश आहेत. आणि काही जणं तर मॅचपूर्वी फुशारक्या मारणाऱ्या पाकिस्तानची मीम्सच्या माध्यमातून खिल्ली उडवत आहेत.अशातच या सामन्यादरम्यान एका पाटीन सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. या पाटीवर असं काही लिहलंय की वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की या पाटीवर असं लिहलंय तरी काय ? तर या पाटीवर “ओरडायचं असेल तर इंडिया इंडिया ओरड..पाक पाक तर कोंबड्या पण करतात” असा टोला लागवत पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. भारताच्या खेळाडूंनी १९ ओव्हरमध्ये मॅच संपवत पाकिस्तानला पराभूत केले. यानंतर सर्वत्र पाकिस्तानची नाचक्की उडाली आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानची खिल्ली उडवणारे मिम्स व्हायरल होत आहेत. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर टीका करत आहेत. एकानं म्हंटलंय “अरेरेरे एका पाटीनं पाकिस्तानचा पार कचरा केला” तर आणखी एकानं, “घरी जा घरी” अशी खिल्ली उडवली आहे.
या आशिया कप २०२५ मध्ये जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदानी सर्वांची मने जिंकली. तसेच मॅच दरम्यान पाकिस्तानी गोलंदाज हारिस रौफला बोल्ड आऊट करुन एका खास अंदाजात त्याला उत्तर दिले. यावेळी सोशल मीडियावर पाकिस्तानकडे भारतासारख्या दर्जेदार गोलंदाज नाही, तर त्याची स्वस्त कॉपी असल्याचे म्हटले आहे.
पाहा व्हिडीओ
भारताच्या विजयानंतर सव्वातासात नेमकं काय काय घडलं?
आशिया चषक २०२५ चा पुरस्कार वितरण सोहळा बराच उशिरा सुरू झाला, परंतु केवळ वैयक्तिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, परंतु नक्वी व्यासपीठावरच उभे होते. पाकिस्तान संघाला उपविजेता संघाची मेडल्स देण्यात आली. पण भारतीय खेळाडूंनी मात्र अखेरपर्यंत ट्रॉफी स्वीकारलीच नाही. क्रिकेट मैदानावर पहिल्यांदाच अशी घटना घडली असेल. भारताचे खेळाडू प्रेंझेटेशन सेरेमनीदरम्यान मैदानावर बसलेले आणि झोपून मोबाईल पाहतानाही दिसले.