मलेशियात राहणाऱ्या भारतीय वंशांच्या व्यक्तीनं अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी तब्बल ३८ हजार रुपये मोजले आहेत. सिंगापूरमधल्या एका आलिशान हॉटेलमध्ये तो एक दिवस राहिला यासाठी त्यानं ५७३ डॉलर म्हणजे जवळपास ३८ हजार रुपये मोजले. या हॉटेलमध्ये राहिल्यावर आपल्याला किमान एक झलक ट्रम्पची पाहता यावी यासाठी त्यांनी खटाटोप केला.

मलेशियामध्ये राहणारा २५ वर्षीय तरुण महाराजा मोहन हा शिखर परिषदेनिमित्त सिंगापूरला आला होता. शांग्री-ला हॉटेलमध्ये तो एक दिवस राहिला यासाठी त्यानं तब्बल ३८ हजारांहून अधिक रुपये मोजले. ट्रम्प यांची एक झलक पाहता यावी यासाठी त्यानं कितीतरी वेळ लॉबीत घालवला. एका इंग्रजी वेबसाईटच्या माहितीनुसार मोहन पाच तासांपासून ट्रम्प यांची झलक पाहण्यासाठी वाट बघत होता. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी मोहनाला काही क्षणासाठी का होईना ट्रम्प यांच ओझरतं दर्शन झालं.

मोहननं याचे फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केले आहे. सिंगापूरमध्ये काल डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जाँग उन यांची भेट झाली. या भेटीत कोरियन द्विपकल्प अण्वस्त्र मुक्त करण्याचे आश्वासन किम यांनी दिले तर ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला सुरक्षेची हमी दिली.