IRCTC Helicopter Service: केदारनाथचे दरवाजे २५ एप्रिलपासून उघडणार आहेत ज्यामुळे आयआरसीटीसीने लवकरच प्रवाशांसाठी एक विशेष सुविधा घेऊ येत आहे. आयआरसीटीसी हेलिकॉप्टरद्वारे केदारनाथचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना देणार आहे, त्यासाठी तुम्हाला फक्त ऑनलाइन बुकिंग करावे लागेल. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या वेबसाइटला भेट देऊन तिकीट बुकिंग करता येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या सुविधेची चाचणी सुरू आहे, जी ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल आणि १ एप्रिलपासून या सुविधेसाठी बुकिंग सुरू करता येईल. हेलिकॉप्टर यात्रेकरूंसाठी फेब्रुवारीमध्ये डीजीसीएने एक परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकांतर्गत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि दर्शनासाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली होती.

IRCTC आणि UCADA यांच्यात ५ वर्षांचा करार

आयआरसीटीसीने उत्तराखंड नागरी उड्डयन विकास प्राधिकरणासोबत (Uttarakhand Civil Aviation Development Authority -UACDA)पाच वर्षांसाठी करार केला आहे. याअंतर्गत प्रवाशांना ५ वर्षांसाठी हेलिकॉप्टर सेवेची सुविधा दिली जाणार आहे. हेलिकॉप्टरने केदारनाथ मंदिरात जायचे असलेले सर्व प्रवासी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून बुकिंग करू शकतात. अधिकृत अहवालानुसार, २०२३ साठी हेलिकॉप्टर सेवेचा प्रवास आयआरसीटीसीच्या हेलीयात्रा च्या वेबसाइट अंतर्गत बुक केला जाऊ शकतो.

हेही वाचा : या गावात नाही एकही रस्ता, कार-बाईकशिवाय कसा करतात कसा प्रवास करतात? जाणून घ्या

उत्तराखंड पर्यटन मंडळात नोंदणी करणे अनिवार्य आहे

मात्र, हेलिकॉप्टर सेवेसाठी बुकिंग करण्यापूर्वी उत्तराखंड पर्यटन मंडळाकडे नोंदणी करावी लागेल. तुम्ही मोबाइल अ‍ॅप किंवा वेबसाइटद्वारे नोंदणी करू शकता. याशिवाय, व्हॉट्सअ‍ॅप सुविधेद्वारे किंवा ८३९४८३३८३३ क्रमांकावर एसएमएस पाठवून हे करता येईल.

हेही वाचा : चार दिवस फिनलँडमध्ये फिरा, आनंदी कसे रहावे शिका सर्व काही मोफत! फक्त अट इतकीच आहे की…

२७ एप्रिलपासून बद्रीनाथला भेट देऊ शकता

चारधाम यात्रा हे उत्तराखंडच्या पर्यटनाचे केंद्र राहिले आहे. देशाच्या विविध भागांव्यतिरिक्त परदेशातूनही लोक येथे मोठ्या संख्येने येतात. चारधाम यात्रेदरम्यान बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीला भेट दिली जाते. केदारनाथचे दरवाजे २५ एप्रिलपासून तर बद्रीनाथचे दरवाजे २७ एप्रिलपासून उघडणार आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irctc helicopter service for kedarnath know how to book special package snk
First published on: 30-03-2023 at 14:44 IST