Viral Video : अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रेयाचे चौथे अवतार मानले जाते. स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि गुरू होते त्यामुळे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ दर्शनाला वेगळे महत्व आहे. दरदिवशी अक्कलकोटमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येते. गुरुवारी श्री स्वामी समर्थांची विशेष पूजा आणि नामस्मरण करणे शुभ मानले जाते. अनेक भक्त या दिवशी अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जातात पण तुम्हाला अक्कलकोटला दर्शनला जाणे शक्य नसेल तर तुम्ही पुण्यातील एका सुंदर स्वामी समर्थाच्या मंदिरात जाऊ शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मंदिर नेमके आहे तरी कुठे? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
पुण्यात या ठिकाणी आहे स्वामींचे सुंदर मंदिर (Swami Samarth’s Temple in Pune)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला स्वामी समर्थाचे एक सुंदर मंदिर दिसेल. या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर व भव्य आहे. या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. व्हिडीओत तुम्हाला महाराजांची सुंदर मूर्ती दिसेल. ही मूर्ती अतिशय आकर्षक दिसून येत आहे. स्वामींचे दर्शन घेण्यासाठी लोक दूरवरून या ठिकाणी येतात. याशिवाय स्वामी समर्थांच्या अनेक प्रतिमा या मंदिरात तुम्हाला दिसेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मंदिर नेमके आहे तरी कुठे? तर हे मंदिर गणेश पेठ परिसरात आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
pune_captures या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणेकरांनो स्वामींचे हे सुंदर मंदिर तुम्ही बघितले का?
श्री स्वामी समर्थ मंदिर
७ गुरूनानक शाळा कापड गंजजवळ, गणेश पेठ पुणे ४११००२”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर मंदिर आहे” तर एका युजरने लिहिलेय, “हो खूप छान मंदिर आहे. स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न वाटते” एक युजर लिहितो, “अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ!” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर ‘श्री स्वामी समर्थ’ लिहिलेय.