प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर दररोज काही ना काही व्हिफीओ किंवा अन्य पोस्ट शेअर करत असतात. आपल्या फॉलोअर्सचं मनोरंजन किंवा एखाद्या गोष्टीची महत्त्वपूर्ण माहिती ते त्या पोस्टमधून देत असतात. नेहमीच मनोरंजन करण्यासाठी ओळखले जाणारे आनंद महिंद्रा यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती किक मारून जीप सुरू करताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओ होत्तोय व्हायरल

तुम्ही बाइकला किक स्टार्ट करताना पाहिलं असेल, पण जीप किक स्टार्ट करतानाचा हा अनोखा व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हे शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की ‘हे स्पष्टपणे कोणत्याही नियमांशी जुळत नाही, परंतु आपल्या लोकांच्या साध्या स्वभावाचे आणि ‘किमान’ क्षमतेचे कौतुक करणे मी कधीही थांबवणार नाही. गतिशीलतेची त्याची आवड आश्चर्यकारक आहे.’

( हे ही वाचा: पिंजऱ्याचे गेट उघडताच सिंहाने केअरटेकरवर मारली उडी अन्… बघा Viral Video)

( हे ही वाचा: वा!! हरणाने मारलेला गोल आणि त्यानंतर केलेलं सेलिब्रेशन पाहून तुम्हीही व्हाल फॅन; पाहा viral video)

नेटीझन्सच्या प्रतक्रिया

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा यांनीही दिलेली प्रतिक्रिया पाहून ते किती बिझनेस माइंडेड आहेत हे समजू येत. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला. हा व्हिडीओ आतापर्यंत २०५.२ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओला १२ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर अनेक लोकांनी रिट्विट केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jeep starts after kick this tricky experiment also caught the attention of anand mahindra watch viral video ttg