महाकुंभमेळा २०२५ सुरु झाल्यापासून सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. महाकुंभमेळ्यात अनेक प्रसिद्ध लोक भेट देताना दिसत आहे. आयआयटी बाबा ते मोनालिसापर्यंत, महाकुंभमेळा २०२५ ने अनेक लोकांना प्रसिद्धी मिळवून दिली. या भव्य धार्मिक कार्यक्रमाचे अनेक रील सोशल मीडियावर शेअर व्हायरल होत आहे. दरम्यान आता एक नवा व्हिडिओ चर्चेत आला आहे जो पाहून नेटकरी चक्रावले आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी देखील चक्रावले आहे आणि हॅरी पॉटर कुंभ मेळ्यात आला आहे का? असा प्रश्न विचारत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाकुंभ मेळ्यात अनेक हॉलीवडू सेलिब्रेटी, प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीमध्ये एका व्हायरल व्हिडीओमुळे महाकुंभमेळ्यात हॅरी पॉटर म्हणजे डॅनियल रॅडक्लिफ आला आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे. या व्हिडीओचे सत्य काय आहे हे जाणून घेऊ या…

काय आहे व्हायरल व्हिडीओचे सत्य?
हॅरी पॉटर हा किती लोकप्रिय आहे हे सर्वांनाच माहित आहे. हॅरी पॉटर हे जेके रोलिंगच्या लेखनातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय काल्पनिक पात्र आहे. दरम्यान हॅरी पॉटर हा चित्रपटात जादूगार हॅरी पॉटरची भूमिका साकारणाऱ्या डॅनियल रॅडक्लिफ हा या पात्राचा चेहरा म्हणूनच ओळखला जातो. हॅरी पॉटर म्हणताच लोकांच्या डोळ्यासमोर पटकन डॅनियलचा चेहरा समोर येतो. दरम्यान व्हिडीओमधील व्यक्तीने पफर जॅकेट आणि क्रीम रंगाच्या शॉर्ट्समध्ये परिधान केले आहे. हा व्यक्ती कुंभमेळ्यातील प्रसादाचा आस्वाद घेत असल्याचे दिसून आले. त्याचा पोशाख सामान्य असला तरी, त्याच्या आकर्षक चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांनी लोकांना चकित केले.

तो हॅरी पॉटर नव्हे

हा व्यक्ती हॅरी पॉटर म्हणजे डॅनियल रॅडक्लिफ सारखा दिसत आहे. दोघांमध्ये थोडेसे साम्य आहे ज्यामुळे पाहताक्षणी लोकांना तो हॅरी पॉटर असल्याचा भास होत आहे पण नीट पाहिले की लक्षात येते की तो हॅरी पॉटर म्हणजेच डॅनियल रॅडक्लिफ नाही.

‘प्रयागराजटॉकटाऊन’ या इंस्टाग्राम हँडलने शेअर केलेल्या एका व्हिडिओला वेगाने लोकप्रियता मिळाली आहे. जगभरातील प्रेक्षकांनी या माणसाला पाहून आश्चर्य व्यक्त केले.

व्हायरल व्हिडिओवर नेटिझन्सच्या मजेशीर प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडिओमध्ये हॅरी पॉटरसारखा दिसणारा व्यक्ती महाकुंभमेळा २०२५ मध्ये प्रसादाचा आस्वाद घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या क्लिपने इंस्टाग्राम वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि त्यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हे साम्य इतके विचित्र होते की सोशल मीडिया वापरकर्ते रीलवर कमेट करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. एका वापरकर्त्याने पटकन लिहिले, “डॅनियल रॅडक्लिफ इथे आहे का? (हा डॅनियल रॅडक्लिफ नाही का?)” तर इतरांनी उद्गार काढले, “भाई, ये तो हॅरी पॉटर है…प्रसाद खाने आया!” (भाऊ, हा हॅरी पॉटर आहे… तो प्रसाद खायला आला आहे!)” पोस्टवर हसण्याच्या आणि धक्कादायक इमोजींसह मजेशीर प्रतिक्रियांचा पूर आला.

पण नेटकऱ्यांनी याची दखल घ्यावी की व्हायरल व्हिडीओमधील व्यक्ती हॅरी पॉटर म्हणजे डॅनियल रॅडक्लिफ नसून थोडाफार त्याच्यासारखा दिसणारा व्यक्ती आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha kumbh 2025 harry potter spotted at prayagraj man goes viral for his uncanny resemblance with daniel radcliffe video snk