स्टंट करणे हे जिवाला धोकादायक ठरू शकते, तरी देखील काही लोक हा धाडस करतात. बाईकने स्टंट करणे, उंच पर्वतांवरून उड्या मारणे, यासारखे अनेक अंगावर काटा आणणारे स्टंट केले जातात. स्टंटच्या नादामुळे अनेकांचा जीवही गेला आहे. तरी देखील त्याची आवड काही सुटताना दिसत नाही. अशाच एका धोकादायक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

@impresivevideo नावाच्या ट्विटर हँडलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक व्यक्ती हवेत स्टंट करताना दिसून येत आहे. व्हिडिओतील व्यक्ती एका शिडीसारख्या वस्तूवर उभा आहे. यावेळी चार भरधाव कार या शिडी सारख्या वस्तूच्या दिशेने वेगाने येतात. मात्र या कार धडक देण्यापूर्वीच व्यक्ती हवेत उलटी उडी घेतो आणि थेट जमिनीवर सुखरूप पडतो. तो खाली पडण्यापूर्वी तिन्ही कार निघून गेलेल्या असतात.

(Viral video : हरीण उड्या मारत सुसाट पोहोचलं रस्त्यावर, क्षणार्धात त्याने जे केले ते पाहून प्रवाशीही हैराण)

तर त्याच्या जिवावर बेतले असते

हा खूप धोकादायक स्टंट आहे. जर चारही कार निघण्यापूर्वी हा व्यक्ती खाली पडला असता तर त्याच्या जिवावर बेतले असते. कारच्या धडकेत किंवा कारच्या खाली आल्याने त्याचा मृत्यू देखील झाला असता. यावरून हा स्टंट किती धोकादायक आहे याची जाणीव होते. तरी देखील काही व्यक्ती असे स्टंट करतात.

या व्हिडिओला २ लाख १४ हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ५ हजारांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने या स्टंटचे कौतुक केले आहे, तर एकाने लँडिंग भयानक होती, असे म्हटले, तर काही युजर्सनी हा स्टंट न करण्याचा सल्ला दिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man black flip video stunt above car gone viral ssb