व्यायाम करणं शरीरासाठी चांगलं असतं. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहातं. मन ताजंतवानं राहतं. रोगप्रतिकारशक्ती वाढते. शिवाय शरीरातील अवयवांचा एकमेकांशी उत्तम समन्वय साधला जातो. त्यामुळे नियमित व्यायाम करायला हवा. अर्थात व्यायाम करण्यासाठी हल्ली उत्तम प्रकारच्या जिम उपलब्ध झाल्या आहेत. जिथे अद्ययावत मशीन्स आणि ट्रेनर्सच्या मदतीने आपण योग्य प्रकारे व्यायाम करू शकतो. मात्र काही मंडळी जिममध्ये केवळ टाईमपास करण्यासाठी जातात. तिथे जाऊन स्टाईल मारण्याचा प्रयत्न करतात. आजकाल जिममध्ये वर्कआउट करताना अचानक मृत्यू झाल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. याशिवाय जिममध्ये वर्कआउट करताना अपघातही घडले आहेत. जास्त वजन वाहून नेल्यामुळे अनेक वेळा इतरांच्या चुकीमुळे अपघाताला बळी पडतात. सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वर्कआउट करताना दुसऱ्या व्यक्तीच्या चुकीमुळे एका तरुणाच्या चेहऱ्यावर सुमारे २० किलो वजनाचा डंबेल पडतो. या घटनेतील आरोपींनाही शिक्षा सुनावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर आतापर्यंत ४ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेक वेळा जिममध्ये वर्कआऊट करताना इतरांच्या चुकीमुळे लोक भीषण अपघाताला बळी पडतात. या घटनेतही असाच काहीसा प्रकार घडला आहे.

२० किलोचा डंबल चेहऱ्यावर पडला

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती जिममध्ये बेंचवर झोपून वर्कआउट करत असल्याचे दिसत आहे. पुढच्याच क्षणी आपल्यासोबत काहीतरी धोकादायक घडणार आहे याची त्याला जराही कल्पना नव्हती. वर्कआउट दरम्यान, आणखी एक व्यक्ती देखील जिममध्ये येतो, ज्याच्या हातात सुमारे २० किलोचा डंबेल असतो. अचानक चालत असताना दुसऱ्या व्यक्तीने हातात असलेले डंबेल कसरत करत असलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर टाकले, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचाVIDEO: पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! आत्महत्या करण्यास गेलेल्या मुलाचे वाचवले प्राण

व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक वापरकर्त्यांनी हा जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. चेहऱ्यावर डंबेल टाकणाऱ्या व्यक्तीला १९ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man jailed for 19 months following accident where he dropped 44lb weight on mans face gym accident video viralon social media srk