करावे तसे भरावे ही म्हणावे ही म्हण आपल्याला इयत्ता ४ थीमध्ये आपण शिकलेली आहे. अनेकदा आपण प्राणी किंवा माणसाचं वाईट चिंतायला अथवा करायला जातो आणि तसाच प्रकार पुन्हा आपल्यासोबत घडतो ज्याला आपण ज्याचं जसं कर्म तसं फळ असं म्हणतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर वाईट केल्यावर वाईटच होतं. याचं ताजं उदाहरण देणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगा गाढवाला मारहाण करताना दिसतोय. पण त्याच्या कर्माचं फळ थेट 5G च्या स्पीडनं त्याला परत मिळालं. हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, ‘याला म्हणतात कर्म!’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूरने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केलाय जो सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओच्या सुरुवातीच्या भागात एक माणूस गाढवाला लागोपाठ मारहाण करताना दिसत आहे. त्याने गाढवाला बांधलेल्या दोन्ही दोरी धरून त्याला लाथा मारतो. यात त्याचं समाधान होत नाही म्हणून तो त्या असहाय्य गाढवाला लागोपाठ कानाखाली मारतो. काही वेळाने तो गाढवाच्या तोडांवर सुद्धा लाथ मारतो. सुमारे २०-२५ सेकंदात या निष्पाप प्राण्याला मारण्यासाठी माणसाने आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. स्वभावाने शांत गाढव हा या माणसाचा रानटीपणा सहन करतो. सुरुवातीला गाढव सर्व छळ निमूटपणे सहन करतो आणि पळून जाण्याचा प्रयत्नही करताना तो दिसतोय. पण, अर्ध्या व्हिडीओनंतर या स्टोपीमध्ये एक मोठा ट्विस्ट येतो.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सरकारी शाळेतल्या ‘मॅडम’चा राजेशाही थाट! शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांकडूनच करून घेतला मसाज

यापुढे जे होते ते पाहून तुम्हाला हसू येईल. पुढच्या काही सेकंदात या माणसाला त्याच्या कर्माचे फळ मिळतं. तो माणूस गाढवावर चढण्याचा प्रयत्न करत असताना गाढवाने त्याला अशी अद्दल घडवली की यापुढे कोणत्या मुक्या प्राण्याला मारताना तो शंभर वेळा विचार करेल. इतकं गाढवाला मारल्यानंतर तो आपल्या पाठीवर या माणसाला कसं बसून देईल. आपल्या पाठीवर हा माणूस बसत असताना गाढवाने त्याचा पाय धरला जमिनीवर गोल-गोल फरफटत फिरू लागला. हे पाहून युजर्सचा प्रतिसाद पाहता गाढवावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचा निकाल पाहून त्यांना एकप्रकारचे समाधान मिळाल्याचे दिसते. हा व्हिडीओ पाहण्यासाठी फारच मजेदार आहे.

आणखी वाचा : जगाचा अंत होण्याआधीचे ‘शेवटचे सेल्फीज’ कसे असतील? AI भविष्यवाणीच्या VIRAL VIDEO मधले फोटोज पाहा!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : “आयुष्य सोपं नाही…!”, ट्रॅफिकमध्ये भर पावसात भिजत होता स्विगी डिलिव्हरी बॉय, पाहा VIRAL VIDEO

बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूरने त्यांच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन ‘जैसी करनी वैसी भरनी’ अशी कॅप्शन देखील लिहिलीय. यावर लोक आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत. यातील एकाने लिहिले की, ‘जो पेरतो त्याला तेच मिळेल’, तर दुसऱ्याने लिहिलं की, ‘बाभळीचं झाड पेरलं तर आंबा कुठून मिळेल’. या व्हिडीओला १ लाख ३० हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर २७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओ लाईक केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man slaps and kicks donkey repeatedly in viral video then instant karma happened prp