Trending UP Government School Teacher Viral Video : आपल्या मुलांनी शिकावं, मोठं व्हावं असं प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं. त्यासाठी मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश घेतला जातो. त्यासोबतच मुलाला बाहेरची शिकवणी देखील लावली जाते. मुलाच्या शिक्षणासाठी आई-वडील जिवाचे रान करत असतात. शिक्षकांना देखील आपल्या विद्यार्थ्याने शिकावं असं वाटत असतं. पण सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यात शिक्षिका विद्यार्थ्यांना शिवकवण्याऐवजी चक्क त्यांच्याकडून आपली मसाज करून घेताना दिसतेय.

हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधल्या हरदोई जिल्ह्यातील सरकारी शाळेतला आहे. इथल्या विकासखंड बावन परिसरात असलेल्या पोखरी प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आलेल्या शिक्षिका खुर्चीवर आरामात बसून राजेशाही थाट करताना दिसत आहेत. सहाय्यक शिक्षिका म्हणून तैनात असलेल्या उर्मिला सिंग या विद्यार्थ्यांना वर्गात शिकवण्याऐवजी आपले हात-पाय दाबून घेताना दिसत आहेत. वर्गात जे विद्यार्थी तिचे ऐकत नाहीत त्या विद्यार्थ्यांना ती धमक्या देत असे. उर्मिला सिंगने यापूर्वीही असेच काही कृत्य केले होते. त्यांनी वर्गात एका विद्यार्थ्याला बोलावून हात पाय दाबण्यास सांगितले. मॅडमच्या भीतीने विद्यार्थिनीने हात दाबायला सुरुवात केली. याचा व्हिडीओ तिथल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर या व्हिडीओने सोशल मीडियावर एकच खळबळ माजली.

ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश

आणखी वाचा : पाय नाहीत, तरीही हार मानली नाही, व्हीलचेअरवर फूड डिलिव्हरी करणाऱ्या Zomato एजंटचा हा VIRAL VIDEO पाहाच!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : जीवाची पर्वा न करता दलदलीत उतरून काळवीटाच्या पिल्लाचा जीव वाचवला! पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लगेचच या शिक्षिकेला निलंबित करण्यात आलं आहे. हरदोई बेसिक एज्युकेशन ऑफिसर (BSA) बीपी सिंह यांनी माहिती दिली आहे की, “मला हा व्हिडीओ मिळाला आहे. तो सोशल मीडियावरूनही समजला आहे. प्रथमदर्शनी, शिक्षिका दोषी आढळली आहे. तिच्या निलंबनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.” बातमी मिळेपर्यंत या शिक्षिकाविरोधात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. मात्र हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना संताप व्यक्त केला आहे. लोक या शिक्षिकेवर टिका देखील करताना दिसत आहेत.