Cooker Blast In Kitchen Video Viral : कुकरमध्ये जेवण बनवणं सोपं असतं. मसाले आणि भाज्यांना मिक्स करून शिट्टी सेट केली की चविष्ट जेवण तयार होतं. भात शिजवायचा असेल, तर फक्त भात आणि पाणी कुकरमध्ये टाकू शिट्टी लावा. कुकरमध्ये जितक्या लवकर जेवण शिजतं तेवढचं ते कुकर धोकादायकही ठरू शकतं. याचं जीवंत उदाहरण एका थरकाप उडवणाऱ्या व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.

सोशल मीडियावर कुकरचा स्फोट झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, किचनमध्ये ठेवलेल्या कुकरचा स्फोट झाला आणि जेवण शिजवणाऱ्या तरुणाची पळता भुई झाली. हा व्हिडीओ इतका खतरनाक आहे की, अनेकांच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. पोटाची खळही भरण्यासाठी जगभरातील सर्वच लोक काम करतात. कारण भूख लागल्यानंतर आवश्यकतेनुसार जेवण मिळावं. परंतु, हेच जेवण बनवताना तुम्ही काही गोष्टींची काळजी नक्कीच घेतली पाहिजे. कुकर योग्य पद्धतीने सुरु करून ते वेळेवर बंद करावे. कुकरमध्ये कशाप्रकारे जेवण बनवले जाते, याची अचूक पद्धत जाणून घेतली पाहिजे.

नक्की वाचा – विद्यार्थ्यांनी पकडला सर्वात मोठा १९ फुटी अजगर, ५६ किलो सापाचा व्हिडीओ पाहून थरकाप उडेल

इथे पाहा व्हिडीओ

कुकरचा स्फोट होण्याआधी तरुण किचनमध्ये थोडासा मागे सरकतो. पण कुकरचा स्फोट इतका भयानक असतो की, त्या स्फोटामुळे त्या तरुणाच्या अंगावर काटा येतो आणि तो स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करतो. कुकरचा स्फोट झालेल्या अनेक घटना समोर आल्या आहेत. शिट्टीच्या माध्यमातून हवा बाहेर न येणे, हे याचं मुख्य कारण आहे. कुकरला धुवत असताना त्याची शिट्टीही साफ करणे अत्यंत गरजेचं असतं. कारण त्यामध्ये अशी कोणती वस्तू अडकू नये, ज्यामुळे हवा बाहेर येण्यास अडथळा निर्माण होईल.