Viral video: आपण अनेकदा समाजकंटकांना आपल्या आजूबाजूला मुलींची छेड काढताना पाहिलं आहे. कधी हे समाजकंटक रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना महिलांना अपशब्द वापरून त्रास देतात तर कधी त्यांचा पाठलाग करताना दिसतात. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत, ज्यामध्ये मुली धाडस दाखवत अशा लोकांना योग्य धडा शिकवताना दिसतात. मुली सार्वजनीक ठिकाणीही आता सुरक्षित नाही याचंच एक उदाहरण सध्या समोर आलं आहे. काही विचित्र लोक गर्दीचा फायदा घेत महिलांवर अत्याचार करतात. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे, ज्यामध्ये एक तरुण गर्दीचा फायदा घेत महिलेला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही संताप होईल.

बऱ्याच वेळा हे विचित्र लोक चालत्या बसमध्ये महिलांचा विनयभंग करताना दिसतात आणि जेव्हा महिलांनी विरोध केला तर त्याऐवजी त्यांच्यावरच हल्ला करतात. अशा लाजिरवाण्या घटनांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात, ज्यांना पाहून लोकही संतापतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पुरुष चालत्या बसमध्ये एका महिलेला बेदम मारहाण करताना दिसत आहे.

महिलेला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, डीटीसी बसमध्ये बरीच गर्दी आहे आणि लोक कसे प्रवास करत आहेत. यादरम्यान एक बदमाश एका महिलेला पाठीमागून चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करतो, ढकलतो. जेव्हा महिलेने त्याला ढकलण्यास विरोध केला तेव्हा त्या पुरुषाने वाद घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान दोघांमधील वाद इतका वाढतो की, पुरुषाने महिलेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.आश्चर्याची बाब म्हणजे हा पुरुष महिलेला मारहाण करत असताना बसमधील एकाही प्रवाशाने महिलेला वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही. प्रत्येकजण फक्त उभा राहून शो पाहतो. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मार्केटिंगचा भन्नाट फंडा! समोसा विक्रेत्यानं काय केलं एकदा पाहाच; VIDEO पाहून व्हाल अवाक्

घर के कलेश नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत १ लाख २१ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर व्हिडिओला अनेक वेळा लाईक करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत युजर्स व्हिडिओवर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले… काही लोक हे जाणूनबुजून करतात, जर त्यांना वाटले असते तर ते स्वत: पुढे गेले असते, पण लोक फक्त शो बघत राहिले. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…बस कंडक्टर कुठे गेला? तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… जर लोकांनी या व्यक्तीला अद्दल घडवली असती तर तो पुन्हा असे कधीही करू शकला नसता.