MHT CET Result 2022 Updates PCM PCB scorecard how and where to download cetcell mahacet org | Loksatta

MHT CET Result 2022 Updates: PCM व PCB चा निकाल जाहीर; कुठे व कसा पाहाल जाणून घ्या

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे यंदा विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा घेण्यात आली होती, काही वेळापूर्वी अधिकृत साईट तांत्रिक बिघाडाने ठप्प झाली होती

MHT CET Result 2022 Updates: PCM व PCB चा निकाल जाहीर; कुठे व कसा पाहाल जाणून घ्या
MHT CET Result 2022 Updates

MHT CET Result 2022 for PCM and PCB Updates: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचा आज (१५ सप्टेंबर) ला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) या विषयांसाठीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. संध्याकाळी पाच वाजल्यापासून cetcell.mahacet.org. या अधिकृत साईटवर मार्कशीट डाउनलोड करता येतील.

यावर्षी, पीसीएम गटासाठी महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा ५ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली होती आणि पीसीबी गट परीक्षा १२ ऑगस्ट ते २० ऑगस्टपर्यंत आयोजित करण्यात आली होती. परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) म्हणून ऑनलाइन मोडद्वारे घेण्यात आल्या. CUET UG परीक्षेप्रमाणे, या वर्षी पीसीएम आणि पीसीबी गटांसाठी २८ ऑगस्ट २०२२ रोजी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्र द्वारे पुनर्परीक्षा घेण्यात आली.

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा निकाल कसा पाहाल?

  • उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट — cetcell.mahacet.org — सुरु करावी
  • मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या स्कोअर कार्ड लिंकवर क्लिक करा
  • उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख विचारला जाईल
  • यशस्वीरित्या लॉग इन केल्यानंतर, स्कोअर कार्ड स्क्रीनवर दिसेल.

दरम्यान, काही परीक्षा केंद्रांवर तांत्रिक त्रुटींमुळे किंवा पाऊस आणि पुरामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नव्हते म्हणून पुनर्परीक्षा आयोजित करण्यात आली होती. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे या विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा घेतली होती आणि उमेदवारांना सांगण्यात आले की, जर त्यांनी पुनर्परीक्षेसाठी नोंदणी केली, तर दुसऱ्यांदा मिळालेल्या गुणांना गृहीत धरण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Baby Octopus : अंड्यातून कसे बाहेर पडत आहेत इवलेसे ऑक्टोपस, पाहा हा सुंदर व्हिडिओ

संबंधित बातम्या

Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा यांच्या पसंतीस पडली देसी जुगाड केलेली ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक; म्हणाले “जगासाठी…”
“मी जाड असल्याचा फोटो…” कान्ये वेस्टचं ट्विटर अकाउंट निलंबित केल्यावर एलॉन मस्क यांचा मोठा खुलासा
Video: लोकलच्या गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली; रेल्वेचालक खाली उतरला अन म्हणाला, “आधी चल.. “
३५० पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगली कुत्र्याची जंगी बर्थडे पार्टी, सोन्याचे बक्षिसंही मिळाले, Viral Video पाहून म्हणाल, ‘यालाच म्हणतात नशीब’
शेजाऱ्यांनी चक्क घरच खांद्यावर उचलून घेतले अन्…; कारण जाणून तुम्हालाही वाटेल कौतुक

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video : स्वप्निल जोशीच्या महागड्या कारचा व्हिडीओ पाहिलात का? लक्झरी गाडीची किंमत आहे…
“कर्नाटकचा मुख्यमंत्री रोज तुमच्या तोंडावर थुंकतोय, तीन महिन्यांपूर्वी क्रांती…”, संजय राऊतांचं शिंदे सरकारवर टीकास्र!
पुण्यात गोवरचा रुग्ण नाही; दीडशे बालकांचे अहवाल नकारात्मक
प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालचा अपघात; मुंबईच्या रुग्णालयात केलं दाखल
PAK vs ENG: “तबीयत ठीक नहीं है तो ५०० रन मारा, ठीक होते तो…” शोएब अख्तरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ओढले ताशेरे