हरनाज संधूने मिस युनिव्हर्स २०२१ चा खिताब जिंकला आहे. तब्बल २० वर्षांनंतर भारताने पुन्हा एकदा ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावला आहे. हरनाजच्या विजयानंतर अनेक बॉलिवूडकरांनीही आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान मिस युनिव्हर्स विजेत्याचा एक व्हिडीओ मन जिंकत आहे, ज्यामध्ये ती तिच्या विजयावर आनंद व्यक्त करत ‘चक दे फट्टे’ असं बोलताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मॉडेल आणि अभिनेत्री हरनाज ही चंदिगडची असून त्याने ब्युटी विथ ब्रेनच्या या स्पर्धेत ८० देशांच्या सौंदर्यवतींना हरवले आहे. हरनाजचा हा विजयी व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकत आहे. प्रियांका चोप्राने तिचं अभिनंदन करताना हरनाझच्या या खास क्षणाचा व्हिडीओ शेअर केला.

( हे ही वाचा: माझे दैवत छत्रपती शिवाजी महाराज! ट्रॅफिकमधील ‘शिवप्रेमी’ची ती कृती पाहून तुम्हीही कराल त्याला मानाचा मुजरा… )

मिस युनिव्हर्स २०२१चा एक व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे, ज्यामध्ये ती विजयानंतर ‘चक दे फट्टे’ म्हणत आपला जोरदार विजय साजरा करताना दिसत आहे.

( हे ही वाचा: संतापलेल्या नवरदेवाच्या भावाने विवाह सोहळ्यात वाहिनीला मारायला केली सुरुवात; घटना कैमेऱ्यात कैद )

प्रियांका चोप्राने ट्विट केले की, ‘२१ वर्षांनंतर क्राऊनला घरी आणल्याबद्दल हरनाज संधूचे अभिनंदन.’

( हे ही वाचा: “तुमच्या छंदाशी कधीही तडजोड…” Miss Universe 2021 हरनाझ संधूने केलं प्रेरणादायी वक्तव्य! )

हरनाजकडे ‘बाई जी कुटंगे’, ‘यारा दियां पौ बरन’ यासह अनेक पंजाबी चित्रपट आहेत, जे पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत. संधू निसर्गप्रेमीही आहे. हरनाझने ग्लोबल वॉर्मिंग आणि निसर्गाच्या संवर्धनावर तिच्या विचारांनी मिस दिवाच्या जजिंग पॅनलची मनेही जिंकली आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Miss universe 2021 after the victory harnaj sandhu says chak de fatte video viral ttg