Monkey Vs Man Fight In Forest Viral Video : जंगलात भटकणाऱ्या प्राण्यांपासून काही माणसं चार हात लांबच राहतात. प्राण्यांसोबत मस्ती करताना अनेकांवर हल्ले झाल्याचे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहिले असतील. माकड, वानर दिसल्यावरही अनेकांच्या अंगावर काटे उभे राहतात. कारण माणसाकडे एखादा खाद्यपदार्थ दिसला की असे प्राणी थेट अंगावरच धावतात. पण वानरासोबत एका चिमुकल्याने भर जंगलात खेळलेल्या कुस्तीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. वानराने या लहान मुलाचे केस पकडल्यावर त्या चिमुकल्यानेही मोठा डाव टाकूत वानराला चांगलीच अद्दल घडवल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. दोघांमध्ये रंगलेला कुस्तीचा थरार पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वानराने केस पकडल्यावर चिमुकल्यानेही नाकी नऊ आणले, पाहा थरारक व्हिडीओ

वेलकम टू राजस्थान नावाच्या इन्स्टाग्रामवर पेजवर वानराचा आणि एका लहान मुलाचा कुस्तीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जय बजरंग बली असं कॅप्शनही या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ इतका मजेशीर आहे की, ९ लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. लाखोंच्या संख्येत व्यूज मिळालेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगासारखा व्हायरल होत आहे. कारण वानराने माणसाशी अशाप्रकारे केलेली कुस्ती क्वचितच कुणी पाहिली असेल. चक्क माणसांप्रमाणेच हा वानर लहान मुलासोबत कुस्ती खेळत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. दोघांमध्ये रंगलेला कुस्तीचा थरार पाहून लोकांना लोटपोट हसू आल्याशिवाय राहणार नाही.

नक्की वाचा – Video : बापरे! विमानतळावर महिलेच्या बॅगेत सापडला चार फुटी साप, सुरक्षा रक्षकांनी पाहिलं अन् तितक्यात…

इथे पाहा व्हिडीओ

एरव्ही वानर मोठ मोठ्या झाडांवर फाद्यांना लटकून उड्या मारताना दिसतात. पण हा वानर भन्नाट असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. कुस्तीच्या आखाड्यात जसे डावपेच आखले जातात, तशाच प्रकारे हा वानर त्या मुलासोबत कुस्ती खेळताना व्हिडीओत दिसत आहे. वानराची आणि मुलाची कुस्ती पाहून अनेकांना विश्वासच बसला नसेल. कारण माणसांप्रमाणे त्या वानराने मुलासोबत डाव टाकण्याचा मोठा कारनामाच केलेलं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर इतका प्रचंड गाजला आहे की, लाखो नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे आणि भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही चक्रावल्याशिवाय राहणार नाहीत, असंच काहीसं हा व्हिडीओ पाहिल्यानंतर वाटतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monkey vs man fight in the forest who is the wrestling champion watch viral video on instagram netizens funny reaction nss