Viral Post :अनेकदा घरात साफसफाई करताना किंवा एखादे महत्त्वाचे कागदपत्र कपाटात शोधताना आपली नजर नकळत शाळेतील जुन्या गोष्टींवर जाते. शाळेतील प्रगतिपुस्तक, गुणपत्रिका, शाळेतील वह्या, पुस्तके आदी सगळ्या गोष्टी पाहून आपल्या शाळेतील आठवणी पुन्हा एकदा ताज्या होतात. तर, आज सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमध्येही असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. एका महिलेने तिची शाळेतील एक खास आठवण शेअर केली आहे.

परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांनी त्याचा निकाल जाहीर होतो. तो अर्थातच आपल्या सर्वांना घरी दाखवावा लागतो. परीक्षेत चांगले गुण मिळाले, तर शाबासकी मिळते आणि कमी गुण मिळाले की, घरी पालकांकडून ओरडा पडतो. पण, अशातच काही पालक विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले तरीही त्यांना पाठिंबा देऊन त्यांचा उत्साह वाढवताना दिसून येतात; जेणेकरून विद्यार्थी पुढच्या परीक्षेत चांगले गुण मिळवतील. तर आज सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. महिलेने एक फोटो शेअर केला आहे; जो तिच्या शाळेतील वहीचा आहे. शाळेतील ही वही इयत्ता सहावीची आहे आणि तिला गणित या विषयात १५ पैकी ० गुण मिळाले आहेत. तर या निकालावर महिलेला तिच्या पालकांची सही घ्यावी लागली होती. गणितात मिळालेले हे गुण पाहून महिलेच्या आईने वहीवर सही तर केलीच; पण एक सुंदर संदेशसुद्धा लिहिला. ‘हा निकाल दाखवणं खूप ध्येयाची गोष्ट आहे’, असा अनोखा संदेश आईने या निकालावर लिहिलेला तुम्हाला दिसेल. महिलेची आई तिच्या लेकीला प्रोत्साहित करण्यासाठी हा संदेश लिहिते. या खास क्षणाचा फोटो काढून महिलेने सोशल मीडियावर शेअर केला आहे. एकदा बघाच ही पोस्ट.

सोशल मिडियावर ही पोस्ट @zaibannn या महिलेच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट शेअर करून महिलेने खास कॅप्शन लिहिली आहे- ‘माझी इयत्ता ६ वीची गणिताची वही सापडली आणि त्यात मी पाहिलं की, आईने माझ्या परीक्षेतील कमी गुण मिळलेल्या निकालावर सही करून खास संदेश लिहून मला प्रोत्साहित केले होते.’ अशी खास कॅप्शन महिलेने या पोस्टला दिली आहे. ही पोस्ट पाहून अनेक जण कमेंटमध्ये त्यांच्या शाळेतील आठवणी शेअर करताना दिसून येत आहेत. तर काही जण महिलेच्या आईने लिहिलेला खास संदेश पाहून भावूक होत आहेत. आणि महिलेला ‘तू भाग्यवान आहेस’, असं म्हणताना कमेंटमधून दिसत आहेत. ही पोस्ट पाहून कालांतराने अनेक जुन्या आठवणी चेहऱ्यावर नकळत आनंद देऊन जातात, असे म्हणायला हरकत नाही