Viral video: सध्या लग्नाचा सीझन असून अनेक लग्न पार पडताना दिसत आहे. गेल्या एक महिन्यापासून अनेक लग्न पार पडली असून यामधील काहींचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लग्नातील निरनिराळे व्हिडीओ कायमच पहायला मिळतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. यामध्ये नवरा नवरी नाही तर चक्क सासूबाईंच्या डान्सची चर्चा रंगली आहे. हा व्हिडीओ पाहून सासूचं प्रेम पाहून प्रत्येक मुलगी म्हणेल “असंच सासर हवं”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नापुर्वी अन् लग्नातही नवरीला सर्वात जास्त कोणाची भीती वाटत असेल तर ती म्हणजे सासू. आपली सासू कशी असेल याची धाकधुक प्रत्येक नवरीला असते. पण समजा हीच सासू ढाँसू निघाली तर…सध्या एका सासूचा व्हिडिओ सोशल मिडियावर धमाल उडवतोय.सासू-सूनेच्या नात्याबद्दल आपण आजवर अनेक किस्से ऐकले आहेत. कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरुन भाडंण तर कधी मायेचा ओलावा देणारे सासू-.सूनेचे हे नाते. सोशल मीडियावर आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत,त्यामध्ये या नात्याबद्दलचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत. यात सासूने सुनेच्या समोरच असा काही धमाकेदार डान्स केला की सून आ वासून बघतच राहिली…

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्टेजवर नवरा नवरीचा साखरपुडा सुरु आहे. नवरा नवरी एकमेकांना अंगठी घालत आहेत, मात्र यावेळी सासूबाईंनाच जास्त आनंद झाला असून त्या जोरजोरात टाळ्या वाजवून नाचत आहेत. त्यांचा हा आनंद बघून सूनही खूश झाली असून या सासूबाईंचं सगळेच कौतुक करत आहेत. तसेच सासूला मनासारखी सूनबाई भेटल्यामुळे इतका आनंद होतोय अशाही प्रतिक्रिया लोक देत आहेत. हा व्हिडीओ आत्तापर्यंत लोकांच्या मनात असलेल्या आणि अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या सासू-सूनेच्या समीकरणाला खोटं ठरवत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल आणि तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ tejaswiranemakeup13 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. एकानं म्हंटलंय, “नशीबवान सून” तर आणखी एकानं “जेव्हा मनासारखी सूनबाई भेटते” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother in law dance for daughter in law welcome wedding ceremony video goes viral on social media srk