Mother son Dance Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी लहान मुले तर कधी वयोवृद्ध माणसे डान्स करताना दिसतात. तुम्ही आजवर अनेक डान्सचे व्हिडीओ पाहिले असेल पण सध्या माय लेकाचा असा एक डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे की पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हायरल व्हिडीओमध्ये मुलगा त्याच्या आईबरोबर सुंदर डान्स करताना दिसत आहे. माय-लेकाची जुगलबंदी पाहून तुम्हीही डान्स केल्याशिवायर राहणार नाहीत.सध्याच्या काळात प्रत्येक लग्नात एक वेगळीच धमाल दिसून येते. नवरा- नवरी असो वा त्यांच्या कुटुंबियातील प्रत्येक सदस्य सर्व असे फुल उत्साहात असतात. मग कधी लग्नातील डान्स करणे असो त्यात प्रत्येकजण आनंदाने सहभागी होत असतो, सध्या सोशल मीडियावर असाच एका माय-लेकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तरुणानं त्याच्या आईसोबत भन्नाट डान्स केला आहे. खानदेशी गाण्यावर ठेका धरत हळद गाजवली आहे. लग्नाचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. त्यांची ठसकेबाज अहिराणी भाषा आपल्याला माहितीच आहे तसेच सोबतच खानदेशी गाणीही प्रचंड व्हायरल होतात. अशाच एका खानदेशी गाण्यावर तरुणानं चक्क आईसोबत हळदीत थिरकला आहे. “माडी बहु तुले येई जाई करमन लगन” या खानदेशी गाण्यावर नवरदेवाचा पारंपारिक डान्स सध्या व्हायरल होतोय. यावेळी आईनंही ठेका धरत डान्स केला आहे.

आई आणि मुलांचे नाते हे जगावेगळे असते. मुलाच्या आनंदासाठी आई वाट्टेल ते करते. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की मुलासाठी आई त्याच्याबरोबर डान्स करते. ती मुलाबरोबर सुंदर डान्स करताना दिसते. त्या दोघांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या त्यांचा डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर love_creation_0.7 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “अरे स्वत: शोध ना काय सांगतोस आईला” तर आणखी एकानं प्रतिक्रिया दिली आहे की, “माय नको सोडजो रे भो.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother son dance viral video groom dance with mother on khandeshi song video goes viral on social media srk