लोकल म्हणजे मुंबईकरांची ‘लाईफ लाईन’. मात्र अनेकांना लोकलचा प्रवास नकोसा असतो. एखादी अनोळखी व्यक्ती या शहरात आली आणि लोकलची गर्दी पाहिली की ‘अहो या मुंबईकरांचे सारं आयुष्यच लोकलच्या प्रवासात जातं’, ‘काय ती गर्दी, काय ती भांडणं’ असं कुत्सितपणे म्हणतात. पण मुंबईकरांना थोडीच याचा फरक पडतोय? कारण आपला अर्धावेळ लोकलमध्ये घालवणाऱ्या मुंबईकरांचं लोकलशी घट्ट नातं जोडलं असतं हे वेगळं सांगायला नको.
भेटा भातुकलीच्या खेळामधल्या खऱ्याखुऱ्या ‘बाहुली’ला
प्रवाशांसोबतच नाही तर ट्रेनमध्ये रोज खाद्यपदार्थ, क्लिप बांगड्या विकायला येणाऱ्यांबरोबरही मुंबईकरांचं किती घट्ट नातं जोडलं असतं, तीही माणसं हळूहळू आपलीशी वाटू लागतात. लोकल प्रवासात दिवसातले तीन चार तास सहज खर्च करणारे हे सारे प्रवासी तो प्रवास अनेकदा मजेशीर आणि आनंददायी करत असतात. कुटुंबासोबत सण साजरे करायला मिळत नाही म्हणून प्रवासातच हौस मौज पुरी करतात. अगदी पाडवा, आषाढी एकादशीला डब्ब्यात पताके लावणं, नवरात्रीत गरबा खेळणं, दिवाळीत कंदील तोरणांनी डब्बा सजवणं असो सारं काही लोकलमध्ये पाहायला मिळतं. कोणत्याही सार्वजिनक वाहनांमध्ये फार क्वचित पाहायला मिळणाऱ्या अनेक गोष्टी मुंबईच्या लोकलमध्ये दिसतील. अगदी ट्रेनमध्ये तुळसीचं लग्न लावण्यात येण्यासारखी दुर्मिळ गोष्ट तुम्हाला लोकलमध्ये पाहायला मिळाली नाही तर नवल.
Viral Video : संगीतसोहळ्यातील नववधूचा परफॉर्मन्स पाहून नवरदेवाला झाले ‘लव्ह अॅट सेकंड साइट’
‘मुंबई: मेरी जान’ या फेसबुक पेजवरून मुंबई लोकलमधला आणखी एक भन्नाट व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात काही प्रवाशांनी धावत्या ट्रेनमध्ये तुळशीच लग्न लावलं असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा कोणत्या मार्गावरील लोकलमधला व्हिडिओ आहे समजू शकलं नाही, पण असे चित्र फक्त मुंबई लोकलमध्येच पाहायला मिळतं हे नक्की!