मुंबई पोलीस दल जगातील सर्वोत्तम पोलीस दलापैकी एक आहे. लोकांच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेले मुंबई पोलीस हळूहळू सोशल मीडियासारख्या माध्यमातून लोकांच्या थेट संपर्कात आले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत ते नागरिकांशी संवाद साधतात. त्यांना माहिती देतात, वेगवेगळ्या उपक्रमातून किंवा मदतीला धावून येणाऱ्या मुंबई पोलिसांनी आपल्या कृतीतून अनेकांची मनं जिंकली आहेत. नुकताच मुंबई पोलिसांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर मुंबई पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

वाचा : पृथ्वीवरच्या प्लास्टिकचे प्रमाण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

Viral Video : अशी गंमत केली तर या उंच काचेच्या पुलावर कोण बरं जाईल?

साकीनाका पोलीस ठाण्यात एक तरूण तक्रार दाखल करण्यासाठी आला होता. एफआयआर दाखल करताना त्या तक्रारदाराचा आज वाढदिवस असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. तेव्हा साकीनाका पोलीस ठाण्यातल्या पोलिसांनी तक्रारदासाठी चक्क केक मागवला. पोलीस ठाण्यातच केक कापण्यात आला. इतक्या हटके प्रकारे या तरुणाचा वाढदिवस याआधी कधीच साजरा झाला नसेल हे नक्की! पोलिसांच्या या कृतीमुळे तो तरूणही भारावला. मुंबई पोलिसांनी त्याला शुभेच्छा देत केक भरवतानाचा त्याचा फोटो ट्विट केलाय. मुंबई पोलिसांच्या दिलदारपणावर ट्विटवर कौतुकांचा वर्षांव होत आहे.

https://twitter.com/dubeyomkar786/status/919239156244480000

https://twitter.com/HasijaVikas/status/919238299956506624

https://twitter.com/theresource24x7/status/919255402822250496

https://twitter.com/ShailendraDesa6/status/919231063708200960