Pune traffic alert: दिवाळी संपल्यानंतर पुण्यात वाहतुकीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हजारो कामगार, विद्यार्थी पुण्यात परत येत आहेत. सणानंतरच्या गर्दीचा अंदाज घेत, पुणे वाहतूक पोलिसांनी प्रमुख महामार्गांवर संभाव्य गर्दीबद्दल वाहनचालकांना इशारा दिला होता. पुण्यात २७ ऑक्टोबर पर्यंत वाहतूक अलर्ट देण्यात आला असून पुण्यातून जाणाऱ्या ३ मोठ्या महामार्गांवर भयानक ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता होती आणि तेच घडलं. आतापर्यंतच सर्वात मोठ ट्राफिक जाम पुण्यात पाहायला मिळालं. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल एवढं नक्की.
आपल्या गावी दिवाळी साजरी केल्यानंतर आता नोकरदार वर्ग आपल्या घरी मुंबईसह इतरत्र शहरांमध्ये परतताना दिसत आहे. त्यातच आज शनिवार- रविवार देखील आहे, त्यामुळे नोकरदारांचीही आणि सुट्टी एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडलेल्यांचीही एकच गर्दी पाहायला मिळत आहे. नुकतीच दिवाळी सण संपला आहे, त्यामुळे नोकरदार वर्ग पुन्हा ऑफिसला जाण्यासाठी आपल्या घरची वाट पकडत आहेत. अनेक महामार्गांवर गावाला जातानाही आणि गावावरून येतानाही मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकचा सामना नोकरदारांना करावा लागत आहे.दिवाळीची सुट्टी आणि त्यानंतर शनिवार- रविवारची सुट्टी असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात आपल्या खाजगी वाहनाने परत मुंबईच्या दिशेने जात आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पुण्यातील नवले ब्रिजवर प्रचंड प्रमाणा गाड्यांची गर्दी दिसत आहे. अक्षरश: १० किलोमिटरच्या रांगा याठिकाणी लागलेल्या आहेत. लोक ट्राफिकमध्ये तासंतास उभं राहून वैतागले आहेत. त्यात हॉर्नचा प्रचंड आवाज सर्वांनाच त्रासदायक ठरत आहे. आता ही गर्दी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे मात्र जे या ट्राफिकमध्ये अडकले होते त्यांना मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे.
पाहा व्हिडीओ
पर्यायी मार्गांचा वापर करा
रहदारी टाळण्यासाठी, गुगल मॅप्स उघडून किंवा स्थानिकांना दिशानिर्देश विचारून प्रमुख महामार्ग टाळा. मुंबई-पुणे मोटरवे, पुणे-बेंगळुरू, पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक किंवा समृद्धी महामार्गांवर लांब रांगेत थांबण्याऐवजी, तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करा. या वाहतूक कोंडीपासून वाचण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सकाळी लवकर, म्हणजे पहाटे किंवा मध्यरात्रीपूर्वी तुमचा प्रवास सुरू करणे.
