American influencer approved as Gujrati: भारतीय गाणी आहेतच अशी की वाजू लागली की त्यावर नाचण्याचा मोह कोणालाही आवरता येणार नाही. अशाच भारतीय गाण्यांवर डान्स व्हिडीओसाठी ओळखले जाणारे अमेरिकन इन्फ्लुएंसर रिकी पॉन्ड यांचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओने इंटरनेटवर सर्वांची मनं जिंकली आहेत.

रिकी पॉन्ड यांनी नवरात्रीनिमित्त एक नवा व्हिडीओ त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवरून पोस्ट केला आहे. यावेळी ‘ढोलीडा’ या हिट ट्रॅकवर त्यांनी अगदी धमाकेदार डान्स केला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये रिकी हे फॉर्मल पोशाखात दिसत आहेत. मात्र, त्यांचा हा व्हिडीओ अगदी देशी स्टाईलने पूर्ण आहे. रिकी या व्हिडीओमध्ये ढोलीडा गाण्याच्या तालावर अगदी प्रो गुजराती लोकांसारखे ठेका धरताना दिसत आहेत. त्यांच्या या ऊर्जेने नेटकऱ्यांना चांगलंच प्रभावित केलं आहे. तसंच काहींनी भारतीय संस्कृतीला रिकी यांनी ज्याप्रकारे स्वीकारले आहे त्याचे कौतुकही केले आहे.

या व्हिडीओवर लगेचच प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यांच्या फॉलोअर्सनी कमेंट्स करत त्यांचं भरपूर कौतुक केलं आहे. तसंच त्यांना ‘Approved as Gujrati’ म्हणजेच गुजराती म्हणून मान्यताप्राप्त अशा कमेंट्स दिल्या आहेत. डान्सच्या माध्यमातून भारतीय परंपरा दाखवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक फॉलोअर्सनी केलं आहे. रिकी यांच्या या व्हिडीओनंतर अनेकांनी सण अधिक समावेशक आणि जागतिक कसे वाटतात हे यातून दिसत असल्याचं म्हटलं आहे.

रिकी पॉन्ड भारतीय संगीतावरील त्यांच्या प्रेमामुळे चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक हिट गाण्यांवर डान्स व्हिडीओ सादर केले आहेत. त्यामुळे त्यांचा एका वेगळाच चाहता वर्ग भारतात तयार झाला आहे. त्यांच्या या नवीन व्हिडीओ रिकी यांनी पुन्हा सिद्ध केले की, ते त्यांच्या चाहत्यांचे इतके आवडते का आहेत. युजर्सनी त्यांना प्रतिकिर्या दिल्या आहेत की, “तुम्ही १०० टक्के भारतीयांपेक्षा चांगले नाचता.” तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, “तुला आता गुजरातमध्ये येऊन नवरात्रीचा आनंद घेण्याची परवानगी मिळाली आहे, आम्ही तुझ्या भेटीची वाट पाहत आहोत.”