गेल्या काही वर्षांपूर्वी अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये मनोरंजक पद्धतीने देवावरील श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक सांगण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये एका सामान्य व्यक्तीने चक्क देवाविरुद्ध खटला दाखल केला होता. सध्या असाच काहीसा प्रकार झारखंड येथील धनबाज जिल्ह्यातून समोर आला आहे. मात्र येथे फरक असा आहे, की कोणत्याही सामान्य व्यक्तीने नाही, तर खुद्द भारतीय रेल्वेनेच देवाला नोटिस पाठवली आहे. हे प्रकरण नक्की काय आहे ते जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झारखंडच्या धनबाज जिल्ह्यातील बेकारबांध येथे १९३१ साली बांधण्यात आलेले हनुमानाचे मंदिर आहे. तेव्हापासूनच येथील स्थानिक या मंदिरामध्ये दैनंदिन पूजापाठ करतात. दरम्यान २९ सप्टेंबरला येथील स्थानिकांना मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक नोटिस चिटकवलेली दिसली. या नोटिसमध्ये लिहण्यात आलंय की या मंदिराने अतिक्रमण करत रेल्वेच्या जमिनीचा ताबा घेतला आहे. तसेच येथील स्थानिकही अनधिकृतपणे या जागेवर राहत असल्याचे रेल्वेने म्हटलंय. त्यामुळे त्यांना १० दिवसांच्या आत ही जागा रिकामी करण्याचे आदेश रेल्वेकडून देण्यात आले आहेत. अन्यथा, मंदिर तसेच स्थानिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा रेल्वेने दिला आहे.

सर्वांत आधी व्यायाम कोण करणार? क्षुल्लक कारणावरून जिममध्ये आपापसातच भिडल्या महिला; Video एकदा पाहाच

दरम्यान रेल्वेच्या या नोटिसविरोधात स्थानिकांनी आक्रोश केला आहे. गेली कित्येक दशके हे मंदिर येथेच आहे. आजवर या मंदिराविरोधात कोणतीही नोटिस आली नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. असे सांगितले जात आहे की मंदिरासह या परिसरातील जवळपास ५० लोकांना नोटिस पाठवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oh my god movie recreated in real life lord hanuman gets notice from railways in dhanbad pvp