कोणाचे नशीब कधी बदलेल सांगता येत नाही म्हणतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये उधळपट्टी करु नये कारण करोडोंची संपत्ती असलेले लोकही रस्त्यावर येतात असं म्हटलं जातं. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती कधीकाळी करोडोच्या संपत्तीचा मालक होता पण आता त्याच्याकडे बिल भरायचेदेखील पैसे नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, जॉन मैक्‍गिनीज नावाच्या व्यक्तीला १०० कोटी रुपयांची लॉटरी लागली होती. पण नंतर त्याचे नशीब असे फिरले की, त्याच्याकडील सर्व पैसे संपले. त्याला कारण ठरला आहे त्याचा उधळपट्टी स्वभाव. त्याने लॉटरीत पैसे जिंकल्यानंतर खूप मौजमजा केली आणि सर्व पैसे महागड्या गाड्या घेण्यात खर्च केले. आता त्याच्याकडे बिल भरण्यासाठीही पैसे नाहीत पण कधीकाळी त्याच्याकडे एकापेक्षा एक महागड्या गाड्यांचे कलेक्शन होते.

हेही पाहा- पाकिस्तानातील तरुणाईला पडली ‘नाटू नाटू’ गाण्याची भुरळ; हर्ष गोयंकांनी शेअर केलेला भन्नाट Video पाहाच

जॉन मैक्‍गिनीजने १९९७ मध्ये १०० कोटी रुपयांची लॉटरी जिंकली होती. लॉटरी जिंकल्यानंतर जॉनने अनेक महागड्या गाड्या विकत घेतल्याचे ‘द सन’च्या रिपोर्टमध्येनुसार, जॉनकडे मर्सिडीज, जग्वार, फेरारी आणि BMW अशा महागड्या कार होत्या. तर ब्रिटनमधील साऊथ लॅनार्कशायरच्या बोथवेलमध्ये त्यांचे १३ कोटी रुपयांचे आलिशान घर होते.

हेही पाहा- लग्न ठरलंय? सावधान! आधी कोर्ट मॅरेज नंतर घरच्यांच्या इच्छेने ७ फेरे; सासरी पोहोचायच्या आधीच पळाली नवरी, कारण…

आता बिल भरायलाही पेैसे नाहीत –

लॉटरी जिंकल्यानंतर जॉनने समुद्रकिनारी ५ कोटी रुपयांचे अपार्टमेंट खरेदी केले. याशिवाय त्याने आपल्या कुटुंबावर सुमारे ३० कोटी रुपये खर्च केले. अनेक ठिकाणी विचार न करता मोठमोठी गुंतवणूक केली. ज्यामुळे त्याला न्यायालयातही जावं लागलं होतं. शिवाय आपण लॉटरीत जेवढे पैसे कमावलं होते ते सर्व गमावल्याचं जॉनच्या लक्षात आलं पण तोपर्यंत वेळ गेली होती.

जॉनने ‘द सन’ला सांगितले, “माझ्याकडे अनेक फेरारी कार होत्या. मी सर्व आलिशान ठिकाणी फिरायला गेलो. पण, आता काही गरजेची वस्तू खरेदी करायची म्हंटलं तरी माझाकडे पैसे नाहीत. एकेकाळी माझ्याकडे डिझायनर कपडे होते. शिवाय ज्या गोष्टींचे स्वप्न पाहिले ते सर्व मी मिळवलं. पण आता शॉपिंगचे बिल कसे भरायचे या चिंतेत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Once man became rich after winning 100 crores rs now lost everything becouse of lavish life jap