Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्यूजन हा बौद्धिक क्षमता ओळखणारा खेळ आहे. अनेकांना ऑप्टिकल इल्यूजनचे कोडे सोडवायला आवडतात. काही कोडे इतके कठीण असतात की सोडविणे अवघड जाते. सध्या असाच एक संभ्रम निर्माण करणारा ऑप्टिकल इल्युजनचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसतंय? तुम्हाला या फोटोमध्ये कॅसेट्स दिसताहेत का पण या कॅसेट्स नाही. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला फोटो नीट पाहावा लागेल.
व्हायरल ऑप्टिकल इल्यूजन
opticalillusionss या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोमध्ये तुम्हाला कॅसेट्स दिसतील. या कॅसेट्सची संख्या असंख्य आहे. पण खरंच या कॅसेट्स आहेत का? त्यासाठी फोटो एकदा नीट पाहा.
फोटो नीट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की या कॅसेट्स नव्हे तर बसेस आहे. जेव्हा आपण फोटो नीट पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येते की या कॅसेट्स नाही. असंख्य रांगेत उभ्या असलेल्या बसेस आहे. हा फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना फोटो पाहून विश्वास बसणार नाही. या फोटोवर लिहिलेय, “तुम्हाला वरुन बसेस दिसताहेत की कॅसेट टेप्स.” या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सुद्धा विचारलेय, “तुम्हाला काय दिसते?”
हेही वाचा : तरुणाची मार्केटिंग स्ट्रॅटेजी! केली चक्क अननसाची हेअरस्टाईल, अननस विक्रेत्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल
पाहा फोटो
हेही वाचा : लोकांच्या जीवाशी खेळ! गाजर विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; भाजी विक्रेत्यांचा घृणास्पद VIDEO व्हायरल
या फोटोवर अनेक युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी फोटोमध्ये कॅसेट्स दिसताहेत , असे लिहिलेय तर काही युजर्सनी फोटोमध्ये बसेस दिसताहेत असे लिहिलेय. एका युजरने लिहिलेय, “खूप संभ्रमित करणारा फोटो आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “या १०० टक्के बसेस आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मला दोन्ही दिसताहेत.
