Optical Illussion : ऑप्टिकल इल्यूजन हा व्यक्तीची बौद्धिक क्षमता ओळखणारा खेळ आहे. बुद्धीला चालना देणारे असे अनेक ऑप्टिकल इल्यूजन सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही ऑप्टिकल इल्यूजन खूप सोपी असतात तर काही खूप कठीण असतात. काही इल्यूजन दिसायला सोपी वाटतात पण सोडवताना अवघड वाटतात. खरं तर ऑप्टिकल इल्यूजन सोडवताना केवळ चांगली दृष्टीच नाही तर सूक्ष्म फरक पटकन ओळखण्याची क्षमता देखील आवश्यक असते. सध्या असाच एक ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोन इमारती दाखवल्या आहेत. या दोन इमारतीमध्ये कोणती इमारत पुढे आहे आणि कोणती इमारत मागे आहे , हे ओळखायचे आहे. फोटो पाहून सुरूवातीला तुम्हाला हे ऑप्टिकल इल्यूजन खूप सोपी वाटू शकते पण नंतर मात्र कठीण वाटेल. (Which building is closer first or second)

ऑप्टिकल इल्यूजन

या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोमध्ये तुम्हाला दोन इमारती दिसतील. या दोन इमारतींमधील कोणती इमारत पुढे आहे आणि कोणती इमारत मागे आहे, हे आपल्याला शोधून काढायचे आहे? Cloverfieldstarlord या अकाउंटवरून रेडिटवर हा फोटो शेअर केला असून या प्रश्नाचे उत्तर विचारले आहेत.

हेही वाचा : “बाबांचे स्वप्न पूर्ण केले पण ते आज हयात नाही” तरुणाची आई ढसा ढसा रडली, पाहा व्हायरल VIDEO

पाहा फोटो

या फोटोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजरनी डावी बाजूची इमारत पुढे असल्याचे सांगितले तर काही लोकांनी उजव्या बाजूची इमारत पुढे असल्याचे सांगितले. एका युजरने लिहिलेय, “या प्रश्नाचे उत्तर आपल्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे” तर एका युजरने लिहिलेय, “मी आजवर पाहिलेलं सर्वात चांगले ऑप्टिकल इल्युजन आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “फोटो पाहून मी संभ्रमात पडलो.”

हेही वाचा : अचानक कोणी आलं अन् हातात चिठ्ठी दिली! टेन्शनमध्ये बसलेल्या तरुणाच्या चेहऱ्यावर काही क्षणात हसू आलं; काय होतं चिठ्ठीमध्ये? पाहा Video

ऑप्टिकल इल्यूजनचे खरे उत्तर

हा फोटो तुम्ही सुरूवातीला पाहाल तर तुम्हाला दोन इमारतीमध्ये पहिली इमारत पुढे आहे, हे कळणार नाही. पण जेव्हा तुम्ही नीट पाहाल तेव्हा कदाचित तुमच्या लक्षात येईल. व्हिडीओमध्ये दोन इमारतीमध्ये असलेले अंतर तुम्ही नीट निरीक्षण करून पाहाल तर कोणती इमारत पुढे आहे, हे लगेच कळेल आणि तुम्हाला स्पष्ट दिसून येईल की डाव्या बाजूची इमारत म्हणजेच पहिली इमारत ही पुढे आहे.