Shocking video: वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. ओव्हरटेकिंग किंवा लेन कटिंगमुळेही बरेच अपघात होतात. काही जणांना अतिआत्मविश्वास नडतो; तर काही जणांचा अंदाज चुकतो. असाच एक अपघात ओव्हरटेक करताना झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, थार चालक घाईघाईत ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतो पण तितक्यात समोरुन एक मोठा ट्रक येतो आणि याला थार कारची धडक बसते. यानंतर मागून एक आणखीन ट्रक त्यांच्या दिशेने येताना दिसतो पण ही घटना पाहून दूरच तो थांबतो. जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही घटना कैद करण्यात आली आहे. या अपघातानंतर, आजूबाजूच्या परिसरात शांतता पसरली आहे. या अपघातामुळे थार चालकाचे चांगलेच नुकसान झाल्याची शक्यता आहे. फुटेज व्हायरल झाल्यानंतर, वापरकर्ते पावसात जास्त वेगाने गाडी चालवल्याबद्दल थार चालकाला दोष देत आहेत. दरम्यान, अपघातानंतर लोक थार चालकाबद्दल विचारणा करत आहेत. दरम्यान ही घटना कधी आणि कुठे घडून आली याची अधिकृत माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. @motordave2 नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत.