‘मिलीनीयर’ प्रशांत नाकतीचं नवं गाणं प्रदर्शित, अवघ्या काही तासातच गाणं तुफान व्हायरल!

२४ तासाच्या आतमध्ये या गाण्याला १ लाखांहून अधिक लोकांनी बघितलं आहे.

prashant miniar
(फोटो: PR)

‘मिलीनीयर’ म्हणून ओळख असणा-या प्रशांत नाकतीच्या मराठी गाण्यांनी महाराष्ट्राला वेड लावलयं. त्याने लिहीलेली, गायलेली सर्व गाणी अवघ्या काही तासातच हीट होतात. सोशल मिडीयावर त्याच्या गाण्यांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. प्रशांतची ‘पोरी तुझ्या नादानं’, ‘माझी बायगो’, ‘लाजरान साजरा मुखडा’, ‘मी नादखुळा’, ‘आपली यारी’ अशी एकाहून एक भन्नाट गाणी तुफान व्हायरल झाली. प्रेमकहाणी सोबत सामाजिक विषय देखील त्यांच्या गाण्यात दिसून येतात. प्रशांत नाकती ज्यांच्या प्रॉडक्शन हाऊसने त्यांच्या नावासारखंच संपूर्ण महाराष्ट्राला मराठी गाण्यांच्या माध्यमातून ‘नादखुळा’ केलं आहे. प्रशांत नाकती यांना संगीत विश्वातील ‘मिलिनिअर’ का म्हणतात हे सर्वांनाच ठाऊक आहे, त्यांच्या गाण्याला महाराष्ट्रातील कानाकोप-यातील प्रेक्षकांकडून मिलिअन प्रेम मिळाले आहे आणि त्या प्रेक्षकांच्या प्रेमाखातरच ते नवनवीन गाणी तयार करतात. असंच एक त्यांचं नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

निखिल नमित आणि प्रशांत नाकती निर्मित ‘तुझा लाल दुपट्टा’ हे नवीन रोमँटिक गाणं लवकरच ‘नादखुळा म्युझिक’ या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळणार आहे. ब-याच विशेष कारणांमुळे हे गाणं अतिशय विशेष आहे. त्यातील पहिलं विशेष कारण म्हणजे या गाण्याच्या निमित्ताने बॉलिवूडचा गायक नकाश अजीज आणि प्रशांत नाकती पहिल्यांदा एकत्र आले आहेत. नकाश अजीजने हे गाणं गायले असून त्याला साथ दिली आहे मोस्ट पॉप्युलर, जिचा आवाज सतत कानावर पडत राहावा असं वाटतं, जिचे सूर थेट मनाला भिडतात अशी गायिका सोनाली सोनावणे हिने. आणखी विशेष कारण असं की या गाण्यात युथ स्टार निक शिंदे आणि ‘बनी’ उर्फ तृप्ती राणे ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. हे गाणं अगदी रोमँटिक, प्रेमळ असं आहे ज्यात प्रेमाच्या भावना आहेत, सुंदर असा डान्स आहे आणि जोडीला बॉलिवूडचा फिल देणारे व्हाईब्स आहेत.

(हे ही वाचा: Viral: ‘भारतीय बास्केटबॉल संघ या महिलेचा शोध घेत आहे’ IAS अधिकाऱ्याने केला खास व्हिडीओ पोस्ट)

(हे ही वाचा: ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील…’ ट्रेंडींग ओळींवर ‘या’ पठ्ठ्याने बनवलं गाणं; Video Viral)

‘तुझा लाल दुपट्टा’ हे गाणं देखील मॅजिकलच असणार कारण या गाण्याचे बोल प्रशांत यांनी लिहिले असून संगीतही त्यांनीच दिले आहे. प्रशांत नाकती यांची गाणी जशी ऐकण्यास खूप छान वाटतात, तशीच तिला पाहण्यात देखील एक वेगळीच मजा असते. नाशिकमध्ये शूट झालेल्या या गाण्याचे दिग्दर्शन सचिन कांबळे यांनी केले आहे. म्युझिक अरेंजरची जबाबदारी संकेत गुरवने पार पाडली असून रोहित जाधव आणि स्वप्नील पाटील यांनी प्रॉडक्शनचे काम पाहिले आहे.

(हे ही वाचा: ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील…’ ट्रेंडींग ओळींवरचं ‘हे’ गाणं एकदा बघाच; Video Viral)

गेले कित्येक वर्षांच्या मिलिअनच्या परंपरेनुसार, यंदाच्या वर्षीचं ‘तुझा लाल दुपट्टा’ हे गाणं पण मिलिअन पटीने वाजणार आणि गाजणार सुध्दा याची खात्री आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prashant nakti new song tujha laal dupatta released and goes viral on social media ttg

Next Story
शपथ घेण्याआधीच देवेंद्र फडणवीस झाले मुख्यमंत्री; पण…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी