गुजरात विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची गुजरातमध्ये जोरदार प्रचारमोहीम सुरू आहे. गुजरात निवडणूक काँग्रेस आणि भाजपानं प्रतिष्ठेची केली आहे. राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये प्रचारसभांचा धडाका लावला आहे. अशातच बुधवारपासून प्रचार सभेमधील राहुल गांधी यांची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्यात राहुल गांधीनीं एक वक्तव्य केलं आहे. ‘ऐसी मशीन लगाऊंगा, इस साइड से आलू डालेंगे और उस साइड से सोना निकलेगा।’. काही सेकंदाची ही व्हिडिओ क्लिप वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाली. लोकांनी, विरोधकांनी या वक्तव्यांवरून राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. इतकंच नाही तर यावरून मीम्सही व्हायरल होऊ लागले. पण ज्या वक्तव्यावरून राहुल गांधींची एवढी खिल्ली उडवली जात आहे ते मुळात राहुल गांधींनी केलंच नसल्याचे उघड झालं आहे.

पाहा कर्मचाऱ्याच्या गैरहजेरीत LinkedIn च्या सीईओंनी नेमकं काय केलं

खरं तर राहुल गांधी भाषणादरम्यान मोदी आणि भाजप सरकारवर निशाणा साधत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. काही वर्षांपूर्वी मोदींनी शेतकऱ्यांना ‘ऐसी मशीन लगाऊंगा, इस साइड से आलू डालेंगे और उस साइड से सोना निकलेगा।’ असं आश्वासन दिल्याचा दावा राहुल गांधी आपल्या भाषणातून केला. इतकंच नाही तर मोंदी फार पूर्वी असं म्हणाले असल्याचंही त्यांनी भाषणात सांगितलं. पण नेहमीप्रमाणे मोदींवर निशाणा साधण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न त्यांच्यावरच उलटला आणि तेच सोशल मीडियावर ट्रोलिंगचा विषय ठरले.

या संपूर्ण भाषणाचा २६ मिनिटांचा व्हिडिओ युट्युबवर उपलब्ध आहे ज्यात १८ व्या मिनिटांला मोदींवर मशिनवरून टीका करताना ते दिसत आहेत. मात्र कोणीतरी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून त्यांचीच टीका त्यांच्यावर उलटवली असं दिसते.

तिच्या एका निर्णयामुळे एकाच वेळी ७० हजार फॉलोअर्सनी केलं अनफॉलो

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandi potato to gold formula from gujarat speech gets twisted into memes but here is the truth