Pune Shocking video: सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. मनोरंजक व्हिडिओशिवाय अनेक सत्य घटनांचे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. सध्या एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला अमानुष मारहाण केली आहे. प्रेमात माणूस इतर सगळं विसरून जातो, असं म्हटलं जातं. मात्र अनेकदा हे प्रेमच अतिशय भयानक रूप घेतं. जोडप्यामधील एकाने दुसऱ्यासोबत अतिशय धक्कादायक कृत्य केल्याच्या किंवा हत्या केल्याच्याही घटना समोर येत असतात. आता आणखी एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून अनेकजणांनी त्या तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेली अनेक जोडपी तुम्ही पाहिली असतील. अशी अनेक जोडपी असतात ज्यांना घरातून नात्यासाठी परवानगी नसते. अशावेळी जगाची पर्वा न करता ही जोडपी गुपचूप एकमेकांना भेटतात. मांजर दुध पिताना डोळे बंद करून पिते म्हणून तिला वाटते की मला कोणीही पाहत नाही” मात्र तिला सगळे पाहत असतात. असंच काहीसं या प्रेमात पडलेल्या तरुणाईचं असतं. घरच्यांचा डोळा चुकवून ते एकमेकांना भेटतात खरे पण कधीतरी ते सापडतातच. अशातच जर हे प्रेम चुकीचं वळण घेत असले तर ते वेळीच थांबवलेलं बरं..याचंच एका उदाहरण दाखवणारा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की , एका तरुणीला तरुण तिच्या गळ्याला आणि केसाला पकडून अक्षरश: मारत घेऊन जात आहे. त्यानं इतक्या हिंसकप्रकारे तिला पकडलं आहे की प्रयत्न करुनही ती स्वत:ला त्याच्या तावडीतून सोडवू शकत नाहीये. मात्र थोड्याच वेळात तरुणी स्वत:ची सुटका करुन घेते आणि तरुणाला मारू लागते.
पाहा व्हिडीओ
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करून या घटनेची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, अशा लोकांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, “हे कसलं प्रेम? या अशा लोकांमुळेच चांगल्या मुलांचे नाव खराब होते. अनेकांनी त्या मुलालवर काय कारवाई झाली की नाही असा प्रश्न विचारला आहे. एका युजरने म्हटले आहे की, घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?”