Shocking Video Viral: उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक माणूसावर तो लग्नातील जेवण बनवताना रोटीवर थुंकला असा आरोप आहे. पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे. त्याचे नाव दानिश असून तो बुलंदशहर जिल्ह्यातील पठाणटोळा भागात राहतो.

व्हायरल व्हिडीओ

FPJच्या वृत्तानुसार आणि अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो माणूस लग्नसमारंभात चपात्या बनवत होता आणि रोटी तंदूर करण्यापूर्वी तो त्यावर थुंकताना दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरला आणि लोकांनी संताप व्यक्त केला. अनेकांनी या घाणेरड्या आणि अपमानास्पद कृतीसाठी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

अटक झाल्याची माहिती देताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. तेजवीर सिंह यांनी सांगितले की, दानिश याच्यावर २ नोव्हेंबर रोजी पहासू पोलिस ठाण्यात संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याला तुरुंगात पाठवले आहे. अधिकारी या घटनेचा मोठ्या प्रकरणाशी संबंध आहे की ही एकट्या व्यक्तीची कृती आहे, याची चौकशी करत आहेत.

स्थानिक लोक आणि सोशल मीडियावरील वापरकर्त्यांनी या कृतीचा निषेध केला. त्यांनी म्हटले की ही केवळ स्वच्छतेच्या नियमांची पायमल्ली नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत अनादरजनक आहे. अनेक लोकांनी पोलिस अधिकाऱ्यांना ऑनलाइन टॅग करून तात्काळ कारवाईची मागणी केली.

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ @ag_Journalist या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की अशा प्रकारच्या कृती सहन केल्या जाणार नाहीत आणि सार्वजनिक आरोग्याला धोका पोहोचवणारे किंवा सामाजिक शांतता बिघडवणारे वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. हा धक्कादायक व्हिडिओ पुन्हा एकदा सार्वजनिक कार्यक्रमांमधील स्वच्छतेच्या नियमांबद्दल चिंता वाढवत आहे. मोठ्या कार्यक्रमांमध्ये अन्न बनवण्याच्या ठिकाणी चांगले निरीक्षण आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणी होत आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकाने कमेंट करत लिहिलं, “अरे, देवा हे चाललंय काय” तर दुसऱ्याने “या अशांना तर लगेच अटक केली पाहिजे” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “हा लोकांच्या जीवाशी खेळ आहे, याला कडक शिक्षा झाली पाहिजे तेव्हाच अक्कल येईल”