Shocking video : साप, अजगर हे शब्द जरी उच्चारले तरी अंगावर काटा येतो. मानवी वस्तीत अनेकदा साप किंवा अजगर आढळून येतात. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. सध्या असाच एक जंगलातला एका अजगराचा थरारक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही सुन्न व्हाल. एका महाकाय अजगरानं लोल्ह्याची शिकार केली आहे. याचा सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुमचा थरकाप उडेल आणि त्यानंतर त्यामध्ये गावकऱ्यांनी जे केलं, ते पाहून धक्काही बसेल.

थरारक व्हिडीओ पाहून युजर्स आवाक्

हा व्हिडिओ झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील बालेडिहा गावाजवळचा असून यात एका अजगराने जिवंत कोल्ह्याला गिळल्याचे दिसून आले आहे. ही घटना बुधवारी सरिया पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात घडली. गुरे चरण्यासाठी आणि शेतीच्या कामासाठी त्या भागात गेलेल्या गावकऱ्यांना शिकारीच्या दरम्यान अजगर दिसला. तो महाकाय साप कोल्ह्याला खाऊ लागला तेव्हा घाबरलेल्या स्थानिकांनी गोंधळ घातला आणि घटनास्थळी अधिक लोक आले.

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते की, अजगराने आपले जबडे पूर्ण उघडून एका मोठ्या कोल्ह्याला गिळले. मात्र, कोल्ह्याचा आकार खूप मोठा असल्यामुळे अजगर त्याला पूर्णपणे पचवू शकला नाही. कोल्हा त्याच्या पोटात मध्यभागी पोहोचताच अजगराची अवस्था बिघडायला लागली. अस्वस्थ होऊन अजगराने कोल्ह्याला पुन्हा बाहेर काढले.कोल्ह्यासारखा चपळ शिकारी अजगराचा शिकार झाल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र पुढच्याच क्षणी अजगर कोल्ह्याला बाहेर काढतो आणि पुन्हा सर्वं आश्चर्यचकित होतात.

पाहा व्हिडीओ

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर viral_india.official या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आता पर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहे. यात एका यूजरने लिहिले की, “म्हणून कधीच ताकदीचा गर्व करु नये” तर आणखी एकानं म्हंटलंय की, “जास्त हाव हाव केली की असं होतं, माणसाने या प्राण्याचा व्हिडीओ पाहावा आणि धडा घ्यावा.”