Shocking video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. मात्र त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, अपघातात जखमी झालेल्या ट्रक ड्रायव्हरला मदत करण्याऐवजी लोक त्याचा व्हिडीओ काढत होते. अपघातात ट्रकला लागलेल्या आगीमध्ये होरपळणाऱ्या ड्रायव्हरला मद करायचं सोडून लोकांनी जे केलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजच्या काळात माणूसकी पूर्णपणे नाहीशी झाल्याच्या घटना आजूबाजूला पाहायला मिळतात. हल्ली लोक इतरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात पण त्यात संधी मिळाली तर फक्त स्वत:चा फायदा बघत राहतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.जगण्‍याचा वेग वाढलाय. येथे थांबायला कोणाचा वेळ नाही. सार्‍यानांचा कमालीचे घाई झाली आहे. प्रत्‍येक रस्‍त्‍यावरील हे चित्र आता आपल्‍या अंगवळणी पडलंय;पण एखादा अपघात झाला असेल तर किमान थांबणे अपघातग्रस्‍ताला उपचार करणे एवढी तसदीही कोणी घेताना दिसत नसल्‍याचेही आपल्‍याला कानावर येते. आजच्या काळात माणूसकी पूर्णपणे नाहीशी झाल्याच्या घटना आजूबाजूला पाहायला मिळतात.सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल की लोकं असं कशी वागू शकतात.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रकचा भीषण असा अपघात झाला असून ट्रक ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. यावेळी ट्रकलाही आग लागली असून त्या आगीत तो वेदनंन विव्हळतोय मात्र जमलेले लोक त्याला मदत करण्याएवजी त्याचा व्हिडीओ काढत आहे. हा जखमी ड्रायव्हर मदतीसाठी विनवण्याही करताना दिसत आहे मात्र कुणीही त्याच्या मदतीला आलं नाही. अशा प्रकारे माणुसकीची हत्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल. हा सगळा प्रकार पाहून माणसात आता माणुसकी शिल्लक राहिली की नाही असा प्रश्न उपस्थित होतो.

पाहा व्हिडीओ

रस्ते अपघात ही देशातील चिंतेचा विषय बनत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लोक वाहतूकीचे नियम पाळत नाहीत. यात अनेकदा रात्रीच्या वेळी भरधाव ट्रक अनेकदा अपघाताचे बळी ठरतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर kabirkashi1398 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे, ज्यावर लोक आपली प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी लोकांच्या वागण्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर अनेकांनी हे फारच वाईट असल्याचे म्हटले आहे.एकानं म्हंटलंय, माणूसकीचा अंत..तर आणखी एकानं, “लाज वाटली पाहिजे…” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video truck accident video instead of helping him some people started record video of him goes viral on social media srk