नॉनवेज खाणाऱ्या लोकांना चिकन खायला खूप आवडतं. केएफसी (KFC) ही कंपनी चिकनच्या अनेक पदार्थ विकते. खाण्यामध्ये भेसळीच्या बातम्या आपण कितीतरी वेळा ऐकल्या असतील परंतु एका महिलेला नॉनवेज फुड खाताना तिच्या दिशमध्ये जे मिळालं ते बघून ती स्तब्ध झाली. तिने तिच्या आयुष्यात असं कधीच बघितलं न्हवतं जसं तिला या केएफसीच्या या ऑर्डरमध्ये बघायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की काय झालं?

ती महिला खूप हैराण झाली जेव्हा तिला तिने विकत घेतलेल्या फ्रेश केएफसी हॉट विंग्स (KFC Hot Wings) च्या बॉक्समध्ये कोंबडीचे पूर्ण डोकं सापडले. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये कोंबडीचचं पूर्ण डोकं, डोळे आणि चोच दिसत आहे.

(हे ही वाचा: Video: मानवी वस्तीत शिरलेल्या दोन सिंहानी बैलाला घेरले, मग काय झाले ते तुम्ही बघाच…)

केएफसी हॉट विंग्सच्या डब्ब्यात महिलेला पिठात डीप करून संपूर्ण डोकं कुरकुरीत तळलेले सापडलं. केएफसी कस्टमर गॅब्रिएलने ट्विकेनहॅम, साउथेस्ट लंडन येथील केएफसी फेल्थम कडून ऑर्डर केली होती.

इंस्टाग्रामवर रिव्हूव लिहत केला फोटो पोस्ट

तिने इंस्टाग्रामवर तिच्या केएफसी जेवणाचे एक धक्कादायक फोटो पोस्ट केला ज्यामध्ये लिहिले होते, ‘मला माझ्या हॉट विंग्ज मीलच्या ऑर्डरमध्ये फ्राइड चिकन हेड सापडले. त्यामुळे मला माझ्या जेवणाचा पूर्ण आनंद घेता आला नाही. ओह’ गॅब्रिएलने जस्टईस्टवरील तिच्या रिव्हूवमध्ये दोन तारे दिले.

(हे ही वाचा: कृतज्ञता! रस्ता ओलांडण्यासाठी गाडी थांबवणाऱ्याचे हत्तीने अनोख्या पद्धतीने मानले आभार; Video Viral)

(हे ही वाचा: पिंजऱ्याचे गेट उघडताच सिंहाने केअरटेकरवर मारली उडी अन्… बघा Viral Video)

केएफसीची प्रतिक्रिया

‘द सन’ मधील वृत्तानुसार, केएफसीने ट्विटरवर सांगितले की, या घटनेने धक्का बसला आहे आणि ग्राहकाने दिलेल्या रिव्ह्यूला ‘मोस्ट जेनरस टू-स्टार रिव्ह्यू’ म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे केएफसीने सांगितले. केएफसीने अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की, ‘आम्ही या फोटोने खरोखरच हैराण झालो आहोत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही गॅब्रिएलच्या संपर्कात आहोत. हे सर्व कसे घडले ते आपण पाहत आहोत.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking woman finds fried chicken head in kfc dish photo viral ttg