चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतावर भाजपाच्या मंत्र्यांनी अलीकडेच टीका केल्या होत्या, आता केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी मानवी उत्क्रांतीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
हल्ली सेलिब्रिटी असो किंवा नेतेमंडळी सगळेच सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट पाहिल्या की कोण काय करतोय, कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरु आहे. एरव्ही पडद्यावर किंवा लोकांत वावरणारे हे सेलिब्रिटी नेतेमंडळी प्रत्यक्षात मात्र खूपच वेगळे असतात. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडीओत मनुष्य आणि प्राण्यांच्या शारीरिक संरचना उत्क्रांतीबाबत माहिती देण्यात आली आहे. या व्हिडीओची निर्मिती वोक्स या वेबसाईटने केली होती. काही दिवसांपूर्वी हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत होता. त्यामुळेच स्मृती इराणी यांनी पुन्हा एकदा त्याला आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत २४ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. सर्व साधारणपणे राजकीय विषयांमुळे चर्चेत असणाऱ्या स्मृती इराणी आता या व्हिडीओमुळे चर्चेत आहेत.