आजकाल सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकदा अंगावर शहारा येतो. त्यासोबत निसर्गाचं चक्र माणसामुळे कसं विस्कळीत होते, याची प्रचिती येते. सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे, इथे रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने चर्चेत असतो. वन्यप्राणी आणि त्यांची जीवनशैली पाहण्याची उत्सुकता कायमच नेटकऱ्यांना असते. त्याच थरारक व्हिडीओंना नेटकऱ्यांनी पसंती असते. नुकताच असाच एक व्हिडीओ समोर आला असून नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहे. तरुण मंडळी एनर्जी किंवा कोल्ड ड्रिंक्स पिताना दिसतात. त्यातही तरुणां प्लास्टिक बाटल्यांपेक्षा अॅल्युमिनियमच्या डब्यात प्यायला आवडते. मात्र डब्बे रिते केल्यानंतर कचराकुंडीत फेकण्याऐवजी इतरत्र फेकून दिले जातात. मात्र ही कृती वन्य प्राण्यांसाठी जीवघेणी ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक साप दिसत आहे. कचऱ्यात पडलेल्या डब्यात डोकं अडकल्यामुळे अस्वस्थ झाला आहे. व्हिडीओमध्ये साप डब्यातून बाहेर येण्यासाठी तळमळताना दिसत आहे.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले असून लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. तसेच या व्हिडीओखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snake head stuck in the box crawls on the road video viral rmt