Car And Truck Shocking Accident Video Viral : जगभरात दररोज शेकडो लोक अपघातांना बळी पडतात. अपघातात कुणी किरकोळ जखमी होतं, कर कुणाला जीव गमवावा लागतो. रस्त्यावर अपघात होण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये ओव्हरटेक करणे आणि ड्रायव्हिंग करताना दुर्लक्ष होणे, ही प्रमुख कारणे आहेत. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर अपघाताचा एक भयानक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा थरारक व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, फ्लायओव्हरचे दोन वेगवेगळे रस्ते पुढे जाऊन एकमेकांना भेटतात. एका रस्त्यावरून एक मोठा ट्रक प्रवास करत असतो. तर दुसऱ्या रस्त्यावरून कार भरधाव वेगाने जात असते. ट्रक तिच्या लेनमधूनच जात असते. परंतु, कार चालक त्याची लेन सोडून ट्रकच्या लेनमध्ये जातो. कार समोर आल्याने ट्रकची टक्कर होते. त्यानंतर हायवेवरच ट्रक गोलगोल फिरून दुसऱ्या बाजूला वळते आणि तोल जाऊन रस्त्यावर ट्रकचा भीषण अपघात होतो.

नक्की वाचा – बायकोसाठी नवऱ्याने स्वत: बनवला LED लाईटचा लेहेंगा, भर लग्नमंडपात नवरी चमकली, पण…

इथे पाहा अपघाताचा भयानक व्हिडीओ

व्हिडीओत पाहू शकता की, ट्रक फ्लायओव्हरच्या बाजूला येते आणि तिचा काही भाग रेलिंगवर आदळतो. त्यामुळे ट्रक चालकाचा नियंत्रण सुटतं आणि ट्रकचा स्फोट होतो. ट्रकला भीषण आग लागल्याने आगीचे लोळ आकाशात जात असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचाही थरकाप उडाला आहे. व्हिडीओला प्रतिक्रिया देत एका नेटकऱ्याने म्हटलं, या अपघाताला जबाबदार असणाऱ्या चालकाला तुरुंगात टाका.