Viral Video : अनेकदा बस, ट्रेनमधून प्रवास करताना किंवा बाजारात खरेदी करायला जाताना तुम्हाला अनेक गोष्टी विकणारे फेरीवाले दिसून येतील. तर ग्राहकांचे लक्ष विक्रेत्यांकडे जावे यासाठी प्रत्येक विक्रेता आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसून येतात. प्रवासादरम्यान गरजेच्या वस्तू विकून, प्रवाशांचे लक्ष केंद्रित करणारे अनेक फेरीवाले तुम्हाला दिसतील; जे वेगवेगळ्या आवाजात, तर काही विचित्र ॲक्शन करून तुमचे लक्ष केंद्रित करताना दिसतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतसुद्धा असच काहीसं पहायला मिळालं आहे. एका फेरीवाल्याचे अजब कौशल्य त्यात पहायला मिळाले आहे.

या व्हिडीओतील व्यक्ती एक फेरीवाला आहे, जो त्याची पेटी घेऊन आईस्क्रीम विकायला निघाला आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक ब्रिज आहे, ज्याला असंख्य पायऱ्या आहेत. कदाचित कोणाचा चालताना तोल गेलाच तर त्याला गंभीर दुखापत होऊ शकते. पण, व्हिडीओतील फेरीवाल्याचा अनोखा स्टंट पाहून तुम्ही खरच चकित व्हाल. फेरीवाला दोन्ही शिड्यांच्या असंख्य पायऱ्यांच्या मधल्या स्टीलच्या सळीवर बसतो आणि अगदी लहान मुलांसारखा घरंगळत खाली उतरतो आणि खाली जाऊन अगदी व्यवस्थित थांबतो. खास गोष्ट अशी की, या दरम्यान फेरीवाल्याच्या डोक्यावर आईस्क्रीमची पेटी आहे आणि कोणतीही मदत न घेता, डोक्यावर पेटी ठेवून, स्वतःचा तोल जाऊ न देता फेरीवाला अगदी बिनधास्तपणे हा स्टंट करताना दिसून येत आहे. फेरीवाला शिड्यांच्या अगदी मधोमध बसून सुरुवातीपासून पायऱ्यांच्या काही अंतरापर्यंत घरंगळत जाताना दिसतो आहे. एकदा बघाच फेरीवाल्याचा अजब स्टंट…

हेही वाचा…३० सेकंदात पंख्याच्या वेगाने या कलाकाराने किती गिरक्या घेतल्या मोजा; बघून म्हणाल, “भावा आम्हाला चक्कर येईल”

व्हिडीओ नक्की बघा :

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ (@tirupathithespritualtcapital) या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो अनेकांना चकित करून सोडत आहे. अनेक जण या व्हिडीओला बघून कमेंटमध्ये पोट धरून हसत आहेत; तर काही जण व्यक्तीला स्टंट करताना बघून विविध शब्दांत आपले मत मांडताना दिसत आहेत.