आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ७२ वी पुण्यतिथी आहे. या दिवशी १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींच्या विमान अपघातादरम्यान झालेल्या मृत्यूची बातमी आली. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक, ओडिशा येथे झाला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आझाद हिंद फौजची स्थापना केली होती. “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा..!” ही घोषणा देणारे सुभाषचंद्र बोस आजही लोकांच्या हृदयात आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. आजच्या या परिस्थितीत त्यांचे विचार अनेकांना ताकद देऊ शकतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेताजी आणि आजचा भारत

 नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे काही प्रसिद्ध कोट्स, घोषणा

१. तुम्ही बलिदान देण्यास तयार राहा.. मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईन. (तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा..!)

२. स्वातंत्र्य मिळत नाही.. मिळवावं लागतं.

३. भारताच्या भाग्याबाबत निराश होऊ नका. जगात अशी कोणतीही शक्ती नाही जी भारताला गुलाम बनवून ठेवू शकेल. भारत लवकरच स्वतंत्र होईल.

४. फक्त चर्चा केल्याने कधीही वास्तविक इतिहासात बदल होत नाही.

५. कधीही अधीर होऊ नका. तसंच कधीही अशी अपेक्षा करू नका की, ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अनेकांनी आयुष्य समर्पित केलं ते तुम्हाला एक-दोन दिवसातच मिळेल.

चिंतनधारा : स्वराज्याचा पाया सुराज्याने

६. व्यर्थ गोष्टींमध्ये कधीही वेळ घालवू नका.

७. मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे की, जेव्हा मी जीवनात भरटकलो तेव्हा कोणत्या तरी किरणाने मला साथ दिली आणि जीवनात भरकटू दिलं नाही.

८. एक व्यक्ती एक विचार मरू शकतो, पण हाच विचार त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर एक हजार आयुष्यात जन्म घेईल.

९. माझ्या साऱ्या भावना मृतवत झाल्या आहेत आणि एका भयानक कठोरतेने मला वेढा घातला आहे.

१०. तुमचं भविष्य हे तुमच्याच हातात आहे.

नेताजी फाइल्स : एका षड्यंत्र सिद्धान्ताची शोधयात्रा

११. अन्याय सहन करणे आणि चुकीशी तडजोड करणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे.

१२. यशाचा दिवस  दूर असेल पण तो येईलच हे मात्र नक्की.

१३. जर संघर्षचं नसेल, कोणतंही भय समोर नसेल तर जीवनातील अर्धा रस संपेल.

१४. जीवनांमध्ये प्रगतीचा आशय हा आहे की, निसंकोचपणे शंका उपस्थित करा आणि त्याचं समाधान मिळवण्याचा प्रयत्न करा.

१५. अपयश हाच कधी कधी यशाचा स्तंभ असतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhash chandra bose death anniversary 18 august 72 death anniversary ttg