सिंहाला पाहताच कोणालाही घाम फुटतो. सिंहाला पाहताच, बाकीचे प्राणीही पळून जातात. पण काही लोक असेही असतात जे सिंहांना घाबरत नाहीत. असाच एक घाबरवून सोडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला हे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धक्कादायक व्हिडीओ

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ आपण पाहिले असतील, ज्यामध्ये सिंहासोबत पुरुष किंवा स्त्री दिसत आहे. ते सिंहाशी असे वागतो की जणू दोघेही चांगले मित्र आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी ६ सिंहीणीसोबत मस्ती करत फिरताना दिसत आहे.

(हे ही वाचा: रेल्वे रुळावर बाईक चालवत होता तरुण, समोरून आली ट्रेन आणि…; बघा Viral Video)

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलगी सिंहीणीसोबत फिरत आहे, हे पाहून असे वाटते की ती सिंहीणीसोबत नाही तर खेळण्यांसोबत खेळत आहे. हा व्हिडीओ जंगलातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला ६ सिंहीण एकत्र येत असल्याचे दिसेल. सिंहीण अगदी आरामात फिरताना दिसते. त्याचवेळी पुढच्याच फ्रेममध्ये एक धक्कादायक गोष्ट पाहायला मिळते. व्हिडीओच्या शेवटी तुम्ही पाहू शकता की मुलीने सिंहिणीची शेपटी धरली आहे.

(हे ही वाचा: समुद्रात पोहताना पाठून आला व्हेल मासा आणि…; बघा Viral Video)

(हे ही वाचा: Viral Video: लग्नात नवरदेव करत होता डान्स तेव्हाच, नवरीने काढली चप्पल आणि…)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ safarigallery नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सोशल मीडिया यूजर्सना मुलीची बेधडक स्टाइल चांगलीच पसंत पडली आहे. लाखो लोकांनी व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओला आतापर्यंत ४६०० हून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The girl was walking in the forest with six lionesses shocking video viral ttg