मध्य अमेरिकेतील कोस्टा रिका या देशात गुरुवारी एक भीषण विमान अपघात झाला. यामध्ये इमर्जन्सी लँडिंग करताना विमान मध्यभागी तुटल्याने त्याचे दोन तुकडे झाले. प्रवासी विमान नसून मालवाहू विमान होते, ही दिलासादायक बाब होती. मालवाहू विमानात इकडून तिकडे वस्तू नेल्या जातात. मालवाहू विमानात फक्त दोन क्रू मेंबर्स होते, त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात जुआन सांतामारिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाला आहे. अपघातानंतर विमानतळ तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते. या विमान अपघाताची माहिती कोस्टा रिकाचे अग्निशमन दलाचे प्रमुख हेक्टर चावेस यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ड क्रॉस कार्यकर्ते गुइडो वास्क्वेझ यांच्या म्हणण्यानुसार, तरीही खबरदारी म्हणून त्यांना क्रू मेंबर्संना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या दुर्घटनेशी संबंधित एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. धक्कादायक व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्य व्यक्त करत आहे. ज्यामध्ये जर्मन लॉजिस्टिक कंपनी DHL च्या पिवळ्या रंगाच्या विमानातून धूर बाहेर येताना दिसत आहे आणि लँडिंग दरम्यान ते धावपट्टीवरून घसरले आहे. एवढेच नाही तर मागची चाके देखील वेगळी झाली.

गुरुवारी म्हणजेच ७ एप्रिल २०२२ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. बोइंग-७५७ विमानाने सांता मारिया विमानतळावरून उड्डाण केले होते, परंतु काही बिघाडानंतर ते २५ मिनिटांनंतरच परतले. त्याचवेळी उतरताना अपघात झाला. क्रू मेंबर्सने स्थानिक अधिकाऱ्यांना हायड्रॉलिक समस्येबद्दल सावध केले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The plane broke into two pieces during an emergency landing rmt