Shocking video: आपल्या आयुष्यात कधी कोणती घटना घडेल याचा काहीच भरवसा नाही. आयुष्यात सुख-दु:खाचे क्षण हे येत असतात. आपल्याला प्रत्येक वेळी सामोरं जाणं हाच एक त्यामागे मार्ग असतो. पण सुखाच्या क्षणांचं क्षणार्धात एखाद्या दुर्घटनेत बदल होणं म्हणजे दुर्दैव! अशा दुर्घटना अनेकदा बघायला मिळतात. सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात. मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र काही काळापासून असे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही कितीही सावधगिरी बाळगली तरीदेखील अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात घडतात. प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे. असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे, कारण मृत्यू कुणाच्या हातात नाही. पण, तरी फिल्मी लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्ये अशी घटना घडली आहे.

मृत्यू कधी कसा येईल हे कोणालाच माहीत नसतं याचं एक उदाहरण हा व्हिडिओ. काही वेळापूर्वी ही महिला हसत होती पण अचानक ती त्या डुकराला बघायला बाहेर आली आणि घाई गडबडीत तिचा तोल गेला. त्यानंतर ती डोक्यावर पडली आणि तिथेच तीचा मृत्यू झाला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मोकळा रस्ता आहे आणि या रस्त्यावरुन एक डुक्कर सारखं इकडून तिकडून नाचताना दिसत आहे. हेच पाहण्यासाठी एका दुकानातील महिला बाहेर येते. यावेळी हे डुक्कर तिच्या दिशेने धाव घेत आणि यालाच घाबरून ती दुकानाचं शटर बंद करण्यासाठी धावते आणि तिचा तोल जातो. यावेळी ती जोरात डोक्यावर आपटते आणि तिथेच तिचा मृत्यू होतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल मृत्यू कसा जाळ्यात ओढतो. या महिलेला ज्याप्रकारे मरण आलं आहे हे पाहून असा शेवट कुणाचाही होऊ नये असं तुम्हीही म्हणाल.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ cj_edits_99 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “मृत्यू वेळ बघून येत नाही” तर आणखी एकानं भयंकर अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The woman lost her balance fell down and died shocking video goes viral on social media srk