गेल्या तीन दशकांपासून तामिळनाडूमधील करुप्पनपाल या गावात कोणतीही बस येत नव्हती. परंतु सोमवारी या गावात तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाची बस आली, सेवा सुरू झाली. गेल्या तीन दशकांपासून ग्रामस्थांनी याबाबत अधिकाऱ्यांनकडे ही समस्या मांडली होती पण काही झाले नाही. गावकऱ्यांना बस साठी गावापासून लांब २ ते ३ किलोमीटर चालत जावे लागायचे. जी समस्या गेल्या तीन दशकात सुटली नाही ती समस्या एका IAS अधिकाऱ्याने पाच दिवसात सोडवली आणि गावात परिवहन महामंडळाची बस आली. याबद्दल स्वतःहा IAS अधिकारी प्रभुशंकर टी गुणालन यांनी त्यांच्या ट्विटरवरून पोस्ट करत माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कसं शक्य झालं हे?

IAS अधिकारी प्रभुशंकर यांच्या ट्विट नुसार ते गुरुवारी १५ जुलैला या गावातल्या गावकऱ्यांना भेटायला गेले होते. तेव्हा गावातील सगळ्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्याच वचनही दिल. जी सेवा ते ३० वर्षांपासून मागत होते ती IAS अधिकारी प्रभुशंकर यांनी ५ दिवसात गावात आणली.

आता रोज २ बस येणार..

IAS अधिकारी प्रभुशंकर यांनी सांगितलं की, “या गावात कधीच बस आली न्हवती म्हणून मी याबाबत TNSTC मध्ये बोलणी केली. जनरल मॅनेजरने यावरती थोडा अभ्यास केला. आणि सोमवार पासून बस सेवा सुरु केली.आता गावात रोज २ बस येणार. जसं जशी गरज लागेल तशी बसची संख्याही वाढवण्यात येईल.

सोशल मिडियावरती IAS अधिकाऱ्यांच कौतुक

या कामाबद्दल लोकांनी आवर्जून कमेंट करत IAS अधिकारी प्रभुशंकर याचं कौतुक केलं आहे. सोबतच हे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्याची पोस्ट शेअर सुद्धा केली आहे. त्यांच्या टीमचही अभीनंदन केलं.

काय म्हणाले गावकरी?

६० वर्षाचे एक आजोबा म्हणाले की, “ या कलेक्टरला साहेबांना मी कधीच विसरणार नाही.” ते पुढे सांगतात की या आधी कितीतरी अधिकारी आले त्यांनी वचनही दिले पण बस सेवा सुरु झाली नाही. या गावात २२० कुटुंब राहतात. जास्त लोक शहरात कामाला जातात. सुरु झालेल्या या बसमुळे आता लोकांची सोय होईल. तर २५ वर्षीय मीना म्हणते की या बस सेवेमुळे जवळ जवळ २००० रुपयांची महिना बचत होईल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There was no bus service in the village for 30 years this ias did five days ttg