आपल्या इथे कोणतेही सेलिब्रेशन असो बॉलिवूडची गाणी हवीच. बॉलिवूडच्या गाण्यांशिवाय पार्टीचा माहोल तयार होत नाही. पण हेच चित्र परदेशात पाहायला मिळाले तर..? बॉलिवूडच्या त्यातूनही सलमान खानच्या गाण्यांवर थिरकणा-या न्यूझीलंड पोलिसांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात काही पोलीस कर्मचारी ‘भाईजान’च्या गाण्यांवर थिरकताना दिसत आहे. न्यूझीलंड पोलिसांच्या ख्रिस्तचर्च पोलीस विभागाने दिवाळी साजरी केली. पोलिसांच्या या दिवाळी पार्टीमध्ये काही पोलिसांनी सलमान खानच्या ‘दबंग २’ मधल्या ‘पांडे जी शिटी’ या गाण्यांवर डान्स केला. प्रेक्षकांकडूनही त्यांना भरभरून प्रतिसाद मिळला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतकेच नाही तर या विभागाच्या महिला पोलीस कर्मचा-यांनी देखील त्यांना उत्तम साथ दिली. त्यानंतर सलमानच्या हल्लीच प्रदर्शित झालेल्या सुलतान चित्रपटातल्या ‘बेबी को बेस पसंद है’ या गाण्यांवर देखील त्यांनी ठेका धरला. त्यांना गाण्यांचे बोल जरी कळत नसले तरी सलमान खानच्या गाण्यातील ब-याच डान्स स्टेप्स त्यांनी हुबेहूब करण्याचा प्रयत्न केला. न्यूझीलंड पोलिसांच्या या बॉलिवूड स्टाईलची त्यातूनही सलमान खान स्टाईल डान्सने अल्पवधीत चांगलीच प्रसिद्ध मिळवली. एकंदर काय सलमानचा चाहता वर्ग हा फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर देखील आहे हे दिसून आले. पॉप, रॉक, जॅझच्या जगात बॉलिवूडच्या गाण्यांनी देखील आपली जागा बनवली आहे. भाषा ओळखीची नसली तरी बॉलिवूडचे संगीत जगाच्या पाठीवर कुठेही वाजले तरी कोणालाही आपल्या तालावर थिरकायला लावू शकते हे मात्र नक्की.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These new zealand policemen dancing to salman khans hit dance numbers