सोशल मीडियावर असे अनेक लोक आहेत ज्यांना या माध्यमातून प्रसिद्ध व्हायचं असतं. काही लोक तर असे असतात जे व्हायरल होण्याकरिता अनेक स्टंट्स करतात. स्टंट्स करणाऱ्या बऱ्याचजणांचे व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर अगदी सहज उपलब्ध होतील. आज आपण असा एक व्हिडीओ पाहणार आहोत, जो इतर व्हिडीओपेक्षा जरा वेगळा आहे. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कोणत्याही तरुणाचा नसून एका वयस्कर व्यक्तीचा आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्की म्हणाल की याप्रकारचे स्टंट्स कोणीही करू शकत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये एक वयस्कर व्यक्ती चालत्या बाइकवर अगदी खतरनाक स्टंट्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी हा व्हिडीओ पाहून चाट पडले आहेत. ज्यापद्धतीने ही व्यक्ती स्टंट्स करत आहे, ते पाहून या व्यक्तीला आपल्या जीवाची पर्वा नसल्याचे दिसून येत आहे.

Video : भारतातील पहिले पोळीभाजी केंद्र ते फक्त लाडू विक्रीची दुकानं; कानिटकरांचा ४० वर्षांचा प्रवास । गोष्ट असामान्यांची : भाग १५

रेल्वे रुळांमध्ये दगड का टाकले जातात माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक कारणे

व्हायरल झालेला हा व्हिडीओ yourenaturegram या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ११ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच नेटकरी या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही देत आहेत. हा व्हिडीओ कितीही व्हायरल झाला आणि याला असंख्य लाईक्स मिळाले तरीही अशाप्रकारचे स्टंट्स करणे अत्यंत धोकादायक आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This old man left youngsters behind in stunts you will be amazed watching video pvp