Viral Post : कामावर जाताना अनेकदा काही कारणांस्तव रस्त्यावर वाहतूक ठप्प झाल्याचे आढळून येते. काही गाड्या रस्त्याच्या मधोमध बंद पडतात; तर काही वाहनचालकांचे एकमेकांशी भांडण होते. अशा अनेक कारणांमुळे अनेकदा रस्त्यावर वाहतूक ठप्प झाल्याचे आढळून येते. पण, तुम्ही कधी एका हेलिकॉप्टरनं रस्त्यावर ट्रॅफिक जॅम केल्याचं दृश्य पाहिलं आहे का? तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं आहे. एका हेलिकॉप्टरनं रस्त्यावर ट्रॅफिक जॅम केल्याचं एक मजेशीर दृश्य बघायला मिळालं आहे; जे बघून तुम्हीसुद्धा चकित व्हाल.

बंगळूरुच्या एका नागरिकानं सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केला आहे; ज्यात तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर दुचाकीस्वारांची एकच गर्दी दिसून येत आहे. तसेच एका मजेशीर कारणामुळे बंगळूरुच्या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली आहे. फोटोत तुम्ही बघू शकता की, दुचाकीस्वारांच्या अगदी समोरच रस्त्यावर एक हेलिकॉप्टर उभं आहे आणि त्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याचं या फोटोत दिसत आहे. हेलिकॉप्टरमुळे कशा प्रकारे वाहतूक ठप्प झाली आहे हे एकदा या पोस्टमधून तुम्हीसुद्धा समजून घ्या …

हेही वाचा…गुदमरलो भावा! २.५ करोडच्या, साऊथ मुंबईतील घराचा Video पाहून व्हाल थक्क; दादा किचनमध्ये शिरताच..

पोस्ट नक्की बघा :

हेलिकॉप्टरमुळे रस्त्यावर वाहतूक ठप्प :

अनेकदा रस्त्यांवर विशिष्ट बांधकामे, गाड्या यांमुळे वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळते. पण, हेलिकॉप्टरनं ट्रॅफिक जॅम केलेलं पाहून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हे एक मोठं ट्विट आहे, असं म्हणायला हरकत नाही. शहराच्या गजबजलेल्या रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या उंच उडणार्‍या या हेलिकॉप्टरनं नागरिकांनाही गोंधळात टाकलं आहे, असं दृश्य तुम्हालासुद्धा पोस्टमध्ये दिसून येईल.

बंगळूरु रहिवासी @aman surana यांच्या ट्विटर अकाउंटवरून हा फोटो शेअर केला गेला आहे. या फोटोवर ‘बंगळूरुमधील ट्रॅफिकची नवी समस्या’ असे मजेशीर कॅप्शन देण्यात आलं आहे. तसेच या परिसरात राहणारे रहिवासी कामावर उशिरा पोहोचण्याचं कारण म्हणून हा फोटो दाखवू शकतात, अशी मजेशीर कमेंट एका युजरनं केली आहे. तसेच अनेक जण हे दृश्य पाहून मजेशीर प्रतिक्रिया देताना कमेंटमधून दिसून आले आहे. याआधीही बंगळूरुच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत; त्यात रिक्षात इन्स्टाग्राम आयडी लिहिणे असो किंवा उबर कंपनीनं प्रवाशाकडून घेतलेलं कमी भाडं असो. या सर्वच गोष्टींच्या यादीत आता या अनोख्या ट्रॅफिक जॅमचाही समावेश झाला आहे.