Train Accident Viral Video : हल्ली लोकांना प्रसिद्ध होण्याची फार हौस असते, त्यामुळे सोशल मीडियावर इतरांपेक्षा काय वेगळं देता येईल यासाठी प्रयत्न करतात. या प्रयत्नात अनेकदा ते स्वत:च्या जीवाशी खेळतात. आता या व्हिडीओतच पाहा ना, ज्यात एक तरुण धावत्या ट्रेनच्या अगदी जवळ उभा राहून व्हिडीओ बनवत होता. त्यावेळी ट्रेनमधून एका व्यक्तीने त्याच्याबरोबर असं काही धक्कादायक कृत्य केलं की, ते पाहून तुम्हालाही भीती वाटेल. त्या तरुणानं विचार केला नसेल की, कोण अशा प्रकारे वागू शकतं. दरम्यान, अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हा तरुण आता आयुष्यात कधी धावत्या ट्रेनजवळ उभा राहणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तुम्ही पाहिलं असेल लोक रेल्वे ट्रॅकजवळ किंवा धावत्या ट्रेनजवळ व्हिडीओ शूट करत असतात. यादरम्यान अनेकदा अपघाताच्याही घटना घडतात. व्हायरल व्हिडीओतही तरुणाबरोबर असाच एक भयानक अपघात झाला, तो ट्रॅकजवळ उभा राहून व्हिडीओ बनवत होता. यावेळी धावत्या ट्रेनमधून त्याला कोणीतरी लाथ मारली. ही लाथ त्याच्या छातीवर इतक्या जोरात बसते की, तो तरुण कळवळून खाली बसतो.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण रेल्वे ट्रॅकजवळ उभा राहून व्हिडीओ शूट करतोय. यावेळी एक भरधाव ट्रेन त्याच्या अगदी जवळून जात असते. याच ट्रेनच्या दरवाजावर उभं राहून प्रवास करणारा एक प्रवासी त्या तरुणाच्या छातीवर जोरात लाथ मारतो. ही लाथ इतक्या जोरात बसते की, तरुण काही सेकंद तसा उभा राहून, नंतर पोट पकडून जमिनीवर बसतो. यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की, तरुणाला किती जोरात लाथ लागली असेल.

हा धक्कादायक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @la_ddu2028 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला, तर अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्यात.

एका युजरने लिहिले, “भाऊ, त्याला जाणूनबुजून दुखवून तुला काय मिळाले?” दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, “मानवता अजूनही जिवंत आहे. भावाने त्याला ट्रेनला धडकण्यापासून वाचवले.” तिसऱ्या युजरने कमेंट केली आहे, “आता हा भाऊ पुन्हा कधीही ट्रेनजवळ उभा राहणार नाही.”