काळ्यापैशाला लगाम घालण्यासाठी सरकारने अचानकपणे नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर सोशल मीडियावर नोटासंदर्भातील प्रतिक्रियांचे वारे वाहताना दिसत आहे. बँकातील रांगा, नोटा जाळण्याचे प्रकार, भ्रष्टाचारी नेत्यांवर फिरणारे विनोद तसेच निर्णयाच्या समर्थन यामध्ये दंग असणाऱ्या नेटीझन्सना चर्चेसाठी सरकारने आणखीन एक मुद्दा दिला आहे.  बँकासमोर होणारी गर्दी कमी करण्यासाठी सरकारने एक नवा नियम केला आहे. एकच व्यक्ती पुन्हा पुन्हा रांगेत उभा राहणे टाळण्यासाठी नोटा बदलण्यासाठी येणाऱ्या खातेधारकाच्या हाताला शाई लावण्याचा नियम सरकारने केला आहे. या नियमामुळे बँकात होणारी गर्दी कमी होईल असे मत वित्त सचिव दास यांनी व्यक्त केले. मोदी सरकारच्या या निर्णयावर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी टीका केली होती. बँकेत येणाऱ्या नागरिकांवर सरकारला अविश्वास दाखविल्याचे मत त्यांनी बोलून दाखविले होते.

राजकीय वर्तुळात या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना नेटीझन्सनीही शाई लावण्याच्या मुद्यावर घाईने व्यक्त होण्यास सुरुवात कली आहे. एका नेटीझन्सने सरकारला शाई घालविण्यासाठी बरेच फंडे उपलब्ध असल्याचे सांगत कायमची निशाणीसाठी टॅटो गोंधण्याचा सल्ला दिला आहे. या ट्विटमध्ये ट्विटरकराने ‘मेरा बाप चोर है’ असे लिहून अमिताभ बच्चन यांच्या जुन्या चित्रपटातील प्रसिद्ध डॉयलॉगचीही जोड दिली आहे. तर एका नेटीझन्सने विनाकारण रांगेत उभे केल्याचा आरोप करत बोटाला शाई लावण्याच्या नियमावलीने सरकार नागरिकांवर बळजबरी करत असल्याचे म्हटले आहे. खातेदारांचे स्व:ताचे पैस काढण्यासाठी बंधन घालणारे हे कोण? असा बोचरा सवालही या नेटीझन्सने उपस्थित केला आहे. एका नेटीझन्सने सरकार सर्वाना फसवे असल्याचे ठरवत असल्याचे म्हटले आहे.