hornbill birds fight in the sky viral video: आयएएस अधिकारी सुप्रिया साहू सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय राहून जंगलातील सुंदर व्हिडीओ शेअर करत असतात. तामिळनाडूच्या रानावनात घडणाऱ्या भन्नाट गोष्टींचे व्हिडीओ सुप्रिया साहू त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून व्हायरल करत असतात. त्यांनी शेअर केलेले व्हिडीओ प्रेरणदायी आणि आश्चर्यकारक असतात. आताही त्यांनी आकाशात हॉर्नबिल पक्षांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडीओ शेअर करून लोकांना आश्चर्यचकित केलं आहे. दोन पक्षांमध्ये आकाशात कडाक्याचं भांडण झाल्याचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

IAS अधिकारी सुप्रिया साहू यांनी हॉर्नबिल पक्षांचा थरारक व्हिडीओ केला शेअर, नेटकरी म्हणाले….

साहू यांनी ट्विटरवर हॉर्नबिल पक्षांचा सुंदर व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये म्हटलंय, “तामिळनाडूच्या नेल्लीयमपैथी आणि वापराई भागात प्रत्येक वर्षी शेकडो हॉर्नबिल पक्षी एकत्र येतात. आकाशात दोन हॉर्नबिल पक्षांमध्ये कडाक्याचं भांडण झाल्याचं सुंदर दृष्य कॅमेरात कैद झाली आहेत. पक्षांमधील थरार धानूपारनने कॅमेराबद्ध केला आहे. दोन पक्षांमध्ये आकाशात रंगलेलं युद्ध या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.” व्हिडीओशिवाय शाहू यांनी या पक्षांचा जबरदस्त फोटोही ट्विटरवर शेअर केला आहे. हे हॉर्नबिल पक्षी एकमेकांसोबत तुंबळ हाणामारी करताना या फोटोत दिसत आहे.

नक्की वाचा – video : बापरे! नवऱ्यासमोरच प्रियकराने नवरीला लावलं कुंकू, भर लग्नमंडपात वऱ्हाडी चक्रावले, नेटकरी म्हणाले, ” नवरीचाही यात सहभाग….”

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यापासून आतापर्यंत १७ हजारांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तसेच ११०० नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईकही केलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “काही कारणास्तव हे हॉर्नबिल पक्षी ड्रॅगनसारखे दिसत आहेत. टेलिव्हिजन सीरिज गेम ऑफ थ्रोन्समधील काल्पनीक क्रिएचर्ससारखे दिसत आहेत.” हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दुसरा नेटकरी म्हणाला, “आश्यर्यकारक मॅम”.

“या पक्षांचा राग पाहिल्यावर जणू काही ते भन्नाट डान्सच करत आहेत, असं वाटतय”, अशी प्रतिक्रिया अन्य एका नेटकऱ्याने दिली. आकाशात उंच भरारी घेणारा गरूड पक्षी तीक्ष्ण नजर ठेऊन शिकार करण्यासाठी नेहमीच सतर्क असतो. पाण्यात असलेला मासा, जमिनीवर फिरणाऱ्या कोंबड्या असो किंवा एखादा साप असो,गरूडाने एकदा नजर मारली की या प्राण्याची शिकार झाल्याशिवाय राहत नाही, गरुड पक्षाचे असे व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two hornbill birds aggressive fight in the sky ias supriya sahu shared viral video on twitter people shocked after watching this video nss